विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
मोबाईल वापरताना आजच्या काळात खूप काळजी घ्यावी लागते, कारण यात सध्या अनेक धोकादायक अॅप्स शिरलेले आहेत. यामुळे अनेकदा प्रश्न उद्भवतो की, गुगल प्ले स्टोअर वापरणे तरी सुरक्षित आहे का? असा एक प्रश्न विचारल्या जात आहे.डिजिटल सिक्युरिटी कंपनी अवास्टने गुगल प्ले स्टोअरवर उपस्थित असलेल्या १९ हजारहून अधिक अॅप्सला वापरासाठी धोकादायक घोषित केले आहे. गुगल प्ले स्टोअरमधील हे सर्व अधिक अॅप्स डिजिटल सुरक्षेसाठी हानिकारक ठरू शकतात. तसेच अॅप्स वैयक्तिक डेटा लीकसाठी जबाबदार सिद्ध होऊ शकतात आणि आपल्या स्मार्टफोनची सुरक्षा धोक्यात आणू शकतात. या व्यतिरिक्त, आपण डिजिटल बँकिंग फसवणुकीबाबत दोषी ठरू शकता, असेही कंपनीने म्हटले आहे.
डिजिटल सिक्युरिटी फर्मने सांगितले की, बहुतेक अॅप्स असुरक्षित असल्याचे आढळले आहे, असे फायरबेस डेटाबेसमध्ये चुकीच्या पध्दतीमुळे झाले आहे. त्यात १९ हजार ३०० हून अधिक अँड्रॉइड अॅप्स मोबाईल वापरकर्त्याच्या डेटाचा गैरवापर करू शकतात. वास्तविक फायरबेस हे एक साधन आहे जे अँड्रॉइड डेव्हलपर वापरकर्ता डेटा साठवण्यासाठी वापरतात. मात्र हे हजारो अँड्रॉइड अॅप्स तुमचे नाव, पत्ता, स्थान, डेटाचा गैरवापर करू शकतात. दरम्यान, याबाबत Google ला अशा असुरक्षिततेबद्दल इशारा देण्यात आला आहे, अशा असुरक्षिततेला सामोरे जाणारे अॅप्स मुख्यतः जीवनशैली, गेमिंग, खाद्य वितरण आणि ई-मेल अॅप्स आहेत. यामुळे, युरोप, दक्षिण-पूर्व आशिया, लॅटिन अमेरिका सारख्या प्रदेशांमध्ये स्थित देशांना सर्वाधिक फटका बसत आहे. फायरबेस-आधारित अॅप्सच्या १० टक्के वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती धोक्यात असल्याचा दावा संशोधनात करण्यात आला आहे.