मुंबई – Google च्या आगामी Google Pixel 6 स्मार्टफोन सीरिजच्या अनावरण झाले असून, या इव्हेंटमध्ये गुगल पिक्सल ६ आणि पिक्सल ६ प्रोवचे अनावरण करण्यात आले. या स्मार्टफोनमध्ये कंपनीतर्फे टेंसर चिपसेट आणि अधिक क्षमतेचा कॅमेरा सेटअपसह नव्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी कंपनीतर्फे Google Pixel 5 चे जागतिक बाजारपेठेत अनावरण करण्यात आले होते.
Google Pixel 6 चे वैशिष्ट्य
Pixel 6 मध्ये लाइव्ह ट्रान्सलेशन म्हणजेच भाषांतराचे नवे फिचर देण्यात आले आहे. मूळ रूपात तुम्ही कोणत्याही इतर भाषेत इन्स्टाग्राम लाइव्ह पाहू शकतात. या स्मार्टफोनवर तुम्हाला लाइव्ह ट्रान्सलेशनचा फायदा मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये टेन्सर चिपसेट सर्वात आधुनिक स्पीच रिकग्निशन मॉडेल आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलत आहात ते स्मार्टफोनला समजत आहे की नाही, हे सुनिश्चित केले जाते. युजर्सच्या सवयी अपडेट करण्यासह सर्वात वेगाने व्हॉइस टाइपिंग सेवासुद्धा या स्मार्टफोनमध्ये सुनिश्चित करण्यात आली आहे, असे गुगलकडून सांगण्यात आले आहे.
Pixel 6 मध्ये या सेवांचा समावेश
Google तर्फे अमेरिकेतील युजर्ससाठी नव्या पिक्सल पास सदस्यता सेवा सादर करण्यात आली आहे. Google One, YouTube Premium, YouTube Music Premium, Google play Pass, Preferred Care या सेवांचा एक्सेस Pixel 6 मध्ये मिळेल. याची किंमत ४५ डॉलर आहे. Pixel 6 Pro सोबत Pixel Pass ची सुरुवात ५५ डॉलर प्रतिमहिना आहे. दोन वर्षांनंतर युजर्ससाठी नव्या पिक्सेलमध्ये अपग्रेड करण्याचा पर्याय मिळेल.
काय आहे किंमत
Pixel 6 मध्ये डुअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. त्यामध्ये ५० एमपीचा प्रायमरी सेंसर आणि १२ एमपीचे अल्ट्रा व्हाइट अँगल लेन्स उपलब्ध आहे. Pixel 6 आणि Pixel 6 Pro दोन्ही स्मार्टफोनमध्ये ५० एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे. Pixel 6 Pro ची किंमत ८९९ डॉलर म्हणजेच ६७,४९४ रुपये आहे. या फोनची प्री बुकिंग सुरू करण्यात आली आहे. Pixel 6 Pro मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
Google Pixel 6 & Google Pixel 6 Pro Introduction Video ?️#GooglePixel6 #GooglePixel6Pro #Google pic.twitter.com/Nbz2nwdtbS
— ER Deep Gill (@ERDeepGillz) October 20, 2021