शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तुम्ही गुगल पे वापरतात का? आता पेमेंट होईल आपोआप; फक्त हे करा…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 3, 2022 | 5:00 am
in संमिश्र वार्ता
0
google pay e1659443482405

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रोखीच्या व्यवहारांऐवजी डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्याकडे भारतीयांचा कल वाढत असून, नेट बँकिंग, डिजिटल वॉलेट, डेबिट-क्रेडिट कार्डच्या तुलनेत ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’द्वारा (यूपीआय) पैसे ट्रान्सफर करण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. आता सर्व व्यवहार युपीआय पेमेंटद्वारे करणारा एक मोठा वर्ग देशात रुजला आहे.

सध्या डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्यासाठी व्यापाऱ्यांनीही त्याला प्रोत्साहन दिले आहे. दारावर येणारा भाजीवाला असो की चौकातील फळवाला या सगळ्यांकडे आता युपीआय पेमेंटची वेगवेगळी साधने उपलब्ध आहेत. फक्त क्युआर कोड स्कॅन करा आणि व्यवहार पूर्ण करा, अशी सोय झाली आहे. आता त्याच्याही पुढे जाऊन, गुगल पेने वापरकर्त्यांसाठी टॅप टू पे हे नवीन फिचर लाँच केले आहे.

यूपीआय पद्धतीचा वापर करून पैसे ट्रान्सफर करताना प्रत्येक वेळी पिन कोड विचारला जातो. याशिवाय ‘स्पॅम मेसेज’, अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करण्यापूर्वी खबरदारीचे संदेशही पाठविले जातात. त्यामुळे वापरकर्त्यांनीही व्यवहाराची खातरजमा करूनच पिनकोड टाकला पाहिजे,’ असेही सांगितले जाते.

आता नव्या फीचरमुळे वापरकर्ते कोणताही क्यूआर कोड स्कॅन न करता पेमेंट करू शकतात. यामुळे केवळ एका टॅपमध्ये पेमेंट करता येणार आहे. वापरकर्ता पीओएस मशीनवर स्मार्टफोन टॅप करून पेमेंट करू शकतो. अर्थात या फीचरसाठी स्मार्टफोनची आवश्यकता आहे. तुमच्या फोनमध्ये एनएफसीची सुविधा असेल तर हे फीचर विनासायस वापरता येईल. टॅप टू पे फिचर वापरकर्त्याला केवळ एका टॅपमध्येच व्यवहार पूर्ण करण्याची सोय करते.

महत्वाचे म्हणजे गुगल पेच्या टॅप टू पे या पर्यायाचा वापर करून यूपीआयच्या माध्यमातून निधी हस्तांतरित करता येईल. या फीचरबाबत कंपनीने सांगितलं की, पेमेंट सहज करता यावे, यासाठी टॅप टू पे फीचर जारी करण्यात आलं आहे. या पूर्वीच बँक कार्डवर हे वैशिष्ट्य आपण पाहिले असेल. वापरकर्ते पीओएस मशीनवर कार्ड टॅप करून पैसे देतात. सॅमसंग पेवर यापुर्वीच असेच पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. गुगल पेने पाइन लॅबच्या सहकार्याने हे फीचर लाँच केले आहे.

आता क्यूआर कोड स्कॅन करण्याऐवजी किंवा यूपीआयशी लिंक्ड मोबाइल नंबर देण्याऐवजी पेमेंट करण्यासाठी वापरकर्त्यांना पीओएस टर्मिनलवर फोन टॅप करावा लागेल, असे गुगल पेने म्हटले आहे. यानंतर वापरकर्त्याला व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्याचा यूपीआय पिन टाकावा लागेल. त्यानंतर पेमेंट प्रक्रिया पूर्ण होईल

गुगलने म्हटले आहे की, ही कार्यक्षमता एनएफसी – अँड्रॉइड स्मार्टफोन असलेल्या कोणत्याही यूपीआय वापरकर्त्याला फायदेशीर ठरेल. वापरकर्ते देशभरातील पाइन लॅब अँड्रॉइड पीओएसवर त्यांच्या स्मार्टफोनवरून टॅप करतील आणि पैसे अदा करतील. हे फीचर वापरण्यासाठी, वापरकर्त्याला सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये एनएफसी तंत्रज्ञान सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन कनेक्शन सेटिंगमध्ये जावं लागेल. सेटिंग्जमध्ये हे फीचर सहज मिळेल.

फोनमध्ये एनएफसी असेल तर सर्च केल्यावर त्याचा पर्याय दिसेल. ते सक्षम केल्यानंतर पुढे तुम्ही गुगल पेज नवं फीचर वापरू शकता. यासाठी अगोदर तुम्हाला तुमचा फोन अनलॉक करावा लागेल. व्यवहार करतेवेळी पेमेंट टर्मिनलवर फोनवर टॅप करावे लागेल. सध्या हे फिचर फक्त पाइन लॅब टर्मिनलवर सुरु आहे. यामुळे सध्या ते पाइन लॅब टर्मिनलवरच काम करणार आहे.फोन टर्मिनलवरून टॅप करताच गुगल पे आपोआप ओपन होईल. त्यानंतर रक्कमेची खात्री केल्यानंतर पैसा अदा करण्याची प्रक्रिया एका टॅपवर होईल.

Google Pay Online Payment UPI QR Code New Service

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला; शिवसैनिकांनी केल्याचा आरोप

Next Post

ड्रग इन्स्पेक्टरकडे सापडले मोठे घबाड; CBIने केली मोठी कारवाई

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
sushila kargi
मुख्य बातमी

अखेर नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की …अंतरिम सरकार स्थापन

सप्टेंबर 12, 2025
road 1
संमिश्र वार्ता

येवला तालुक्यातील या जिल्हा मार्ग रस्त्यांची राज्य मार्गात दर्जोन्नती…

सप्टेंबर 12, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

अतिवृष्टीमुळे नुकसानीपोटी बाधितांना ७३ कोटी ९१ लाखाची मदत….या जिल्ह्यातील शेतक-यांना मिळणार लाभ

सप्टेंबर 12, 2025
IMG 20250912 WA0319 scaled e1757675834888
स्थानिक बातम्या

नाशिकच्या जलतरणपटूंनी कॅटालिना चॅनल रिले मोहीम यशस्वी करून रचला इतिहास…

सप्टेंबर 12, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये विद्युत उपकेंद्रातील रोहित्र क्षमतावाढीचे काम सुरु…शनिवारी या भागातील वीजपुरवठा राहणार बंद

सप्टेंबर 12, 2025
jilha parishad
संमिश्र वार्ता

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर…नाशिकचे आरक्षण या गटासाठी आरक्षित

सप्टेंबर 12, 2025
crime 13
क्राईम डायरी

इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू….लहवित येथील घटना

सप्टेंबर 12, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

ड्रग इन्स्पेक्टरकडे सापडले मोठे घबाड; CBIने केली मोठी कारवाई

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011