मुकुंद बाविस्कर, मुंबई
गेल्या पाच वर्षापूर्वी नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन पेमेंट तसेच ऑनलाईन बँकिंग व्यवहार वाढले आहेत. सहाजिकच यासाठी वेगवेगळ्या ॲपचा वापर करण्यात येतो त्यात गुगल पे चा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. ऑनलाइन पेमेंटसाठी गुगल पे ने आणखी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
गुगल पे हे भारतात मोठे वापरकर्ता अॅप आहे. तसेच व्यवहार आणि डिजिटल व्यवहारांसाठी करोडो लोक या अॅपचा वापर करतात. त्यामुळे Google वेळोवेळी आपल्या अॅपमध्ये अनेक विशेष आणि सुरक्षा वैशिष्ट्ये आणत आहे. या वैशिष्ट्यांचा उद्देश अॅप वापरकर्त्यांचे व्यवहार सुरक्षित ठेवणे आणि त्यांचा वापरकर्ता अनुभव अधिक चांगला करणे हा आहे.
या संदर्भात, Google Pay आपल्या अॅपमध्ये काही नवीन वैशिष्ट्ये जोडणार आहे. हे नवीन फीचर्स युजर्सला चांगला अनुभव आणि सेवा देण्यासाठी काम करतील. त्यामुळे Google Pay वापरणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे होईल. कारण Google आपले अॅप आणखी चांगले आणि अधिक सुरक्षित करण्यासाठी दीर्घकाळापासून काम करत आहे. आता Google Pay च्या 4 उत्कृष्ट वैशिष्ट्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
1) गुगल पे आता आपल्या अॅपमध्ये हिंदी आणि इंग्लिश ( हिंग्लिश ) भाषेचे वैशिष्ट्य आणणार आहे. हे वैशिष्ट्य मुख्यतः हिंग्लिश भाषेचा वापर त्यांना मदत करणार आहे. त्यामुळे पैसे पाठवताना, आपण हिंग्लिश भाषेत Google Pay वापरू शकता.
2) स्पीच टू टेक्स्ट फीचर तुमच्या डिजिटल व्यवहारांची प्रक्रिया खूप सोपी करेल. या फीचरच्या मदतीने तुम्ही पैसे पाठवताना कोणाचाही अकाउंट नंबर बोलून फीड करू शकता. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवाजाने पैसे ट्रान्सफर करू शकाल.
3) याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे माय शॉप फिचर असून त्याचे उद्दिष्ट अधिक खरेदीदारांना Google Pay शी जोडणे आहे. अनेक दुकानदार Google Pay अॅपवर त्यांचे दुकान किंवा दुकानाची माहिती प्रदर्शित करण्यास पात्र असतील. माय शॉप फीचरच्या मदतीने यूजर्स कोणत्याही वस्तूची ऑर्डर बुक करू शकतील.
4) गुगल पेच्या या फीचरमुळे तुम्ही एकाच वेळी अनेकांना पैसे पाठवू शकाल. समजा, तुम्हाला 5 मित्रांना प्रत्येकी 200 रुपये पाठवायचे आहेत. अशा वेळी तुम्हाला 1000 रुपये टाइप करावे लागतील, त्यानंतर पुढील टप्प्यात (चरणात ) तुम्हाला 5 त्या मित्रांची नावे निवडावी लागतील, ज्यांना पैसे पाठवायचे आहेत. त्यानंतर, तुमचा पिन टाकताच, लगेचच सर्व 5 जणांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील. यामुळे तुम्हाला स्वतंत्रपणे पैसे हस्तांतरित करण्याची आवश्यकता नाही. या फीचरच्या मदतीने तुम्ही बिल देखील एकाच वेळी विभाजित करू शकता.