विशेष प्रतिनिधी, मुंबई
जगभरात मेसेजिंग अॅप म्हणून व्हॉट्सअॅपचा सर्वाधिक वापर होतो. अर्थात नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे व्हॉट्सअॅप वादात आहे आणि काही देशांमध्ये त्याचे युझर्सही घटले आहेत. अशात अनेक नवे प्लॅटफॉर्म पर्यायी व्यवस्था म्हणून पुढे आले. टेलिग्राम त्यात सर्वांत आघाडीवर होते, पण त्याला यश मिळाले नाही. मात्र आता चक्क गुगलनेच व्हॉट्सअॅप पुढे आव्हान उभे केले आहे. कारण आता व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी गुगलने एक शानदार अॅप आणले आहे.
गुगलचे हे अॅप जीमेलमध्ये असणार आहे. अर्थात जी–मेलचे युझर्स अँड्रॉईड आणि आयओएस डिव्हाईसमध्ये गुगल चॅट अॅपला इंटिग्रेट करू शकणार आहेत. जीमेलमध्ये आता युझर्सला ई–मेलसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी Meet आणि Room चा सपोर्ट दिला जाईल.
जीमेलचे चॅटिंग अॅप आतापर्यंत फक्त पर्सनल अकाऊंटसाठीच उपलब्ध होते. जीमेल अॅपमध्ये युझर्सला आता खालच्या भागाला चार टॅब दिसतील. नव्या चॅटिंग फिचरला लॉन्च केल्यानंतर गुगलच्या वतीने हँगआऊट बंद केले जाईल, अशीही शक्यता आहे. आतापर्यंत जीमेल युझर्स हँगआऊटच्या माध्यमातून चॅटिंग करायचे.
असा करावा वापर
युझर्सला सर्वांत पहिले जीमेल अॅप अपडेट करावे लागेल. त्यासाठी अँड्रॉईड युझर्सला गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस युझर्सला एप्पल स्टोअरमध्ये जावे लागेल. अॅप अपडेट झाल्यावर जीमेलला जाऊन सर्वांत वर डावीकडे असलेल्या सँडविच बटणवर क्लिक करावे लागेल. त्यातून साऊंड बार ऑप्शन ओपन होईल. त्यात सेटिंगमध्ये जा आणि पर्सनल अकाऊंट सिलेक्ट करा. इथे चॅट ऑप्शन दिसेल. ते एनेबल करावे लागेल. त्यानंतर जीमेल अॅप रिस्टार्ट केल्यास चॅटिंग ऑप्शन दिसायला लागेल.