विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
फोन स्क्रीन आणि अॅपचा रंग तसेच डिझाइन बदलण्याच्या पर्यायापासून ते कार अनलॉक करण्याच्या सुविधा गुगल आपल्या स्मार्टफोनचे नवे रूप अँड्रॉइड-१२ मध्ये देणार आहे. नवे फिचर आणि नियम बदलण्याची घोषणा सुंदर पिचाई आणि त्यांच्या गुगलच्या टीमने केली आहे. गुगलच्या जीमेलमधून १८ महिन्यांनंतर डाटा आपोआप डिलीट होणार आहे. अशा प्रकारच्या अनेक घोषणा गुगलने आपल्या वार्षिक कार्यक्रम गुगल आयओमध्ये केल्या आहेत.
अँड्रॉइड-१२ मध्ये अनेक नवे फिचर
फोनद्वारे कार लॉक-अनलॉक
फोन आणि अॅपमध्ये आवडीचे रंग आणि डिझाइन बदलण्याच्या फिचरला मेटेरियल-यू फिचर असे नाव देण्यात आले आहे. युजर्स इंटरफेसमध्ये आपल्या मर्जीप्रमाणे रंग भरू शकतात. त्याशिवाय विजेट्सला रिडिझाइन करण्यात आले आहे. फोनद्वारे बीएमडब्ल्यूसारख्या कारचे मालक आपली कार अनलॉक करू शकणार आहेत. इतर कारच्या कंपन्यांसोबत अशीच सेवा देण्याबाबत चर्चा सुरू आहे.
गुगल मॅपमध्येही सुधारणा
इमारतींच्या आत मदत
सुंदर पिचाई म्हणाले, गुगल मॅप हवामानाचा अंदाज घेऊन सूचना करू शकणार आहे. यामुळे रस्ते अपघात रोखण्यात मदत मिळणार आहे. मॅपवरील ऑग्मेंटेड रिएलिटीद्वारे रस्ता वाहतुकीचे संकेत आणि इमारतींच्या आत मदत होणार आहे.
फेक न्यूजसाठी सर्च अलर्ट
३ डॉटवर क्लिक करून गुगल सर्च रिझल्टसह सोर्स राइटची माहिती देऊ शकणार आहे. सध्या हे फिचर इंग्रजी भाषेत असेल. नंतर हळूहळू इतर भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.
जीमेल ः १५ मिनिटांची हिस्ट्री डिलीडचा पर्याय
सुंदर पिचाई म्हणाले, जीमेलवर २०० कोटी सक्रिय अकाउंट आहेत. युजर्सच्या गोपनीय माहितीचे संरक्षण करणार असल्याचे सांगत १८ महिन्यांत जीमेलचा डाटा डिलीट करण्याचे गुगलने नवे धोरण तयार केले आहे, असे ते म्हणाले. तसेच गुगल सर्चमध्ये १५ मिनिटांची हिस्ट्री डिलीट करण्याचा पर्यायही दिलेला आहे. गुगल सर्चचा वेग वाढविण्यासाठी ७५ भाषांमध्ये काम करताना फोटो आणि व्हिडिओ मिळून सर्च करण्यायोग्य बनविले जात आहे.
अँड्रॉइड-१२ ः २२ टक्के कमी घेणार जागा
आज जगभरातील ३०० कोटी सक्रिय अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये अँड्रॉइडचा वापर केला जात आहे. अँड्रॉइड-१२ मध्ये सीपीयूचा २२ टक्के कमी वापर होईल. फोनला अधिक सुरक्षित बनविण्यासाठी डॅश बोर्डला ही परवानगी दिली जाणार आहे. कॅमेरा आणि मायक्रोफोनचा वापर करण्यासारख्या संवेदनशील परवानग्यांसुद्धा सोप्या पद्धतीने सर्व अॅपसाठी बदलल्या जाऊ शकणार आहे.
https://twitter.com/Google/status/1394826848350113792