नवी दिल्ली – गुगलने प्रतिस्पर्धाविरोधी धोरण स्वीकारल्याचे दोषी मानून कंपनीवर ९०४ कोटी रुपयांचा दंड इटलीने ठोठावला आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनचा पत्ता सांगणार्या एका सरकारी मोबाईल अॅपला आपल्या अँड्रॉइड ऑटो व्यसपीठ उपलब्ध करून न दिल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.
कंपनीने या जूसपासला अँड्रॉइड ऑटोवर तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश इटलीच्या प्रतिस्पर्धा आणि बाजार ऑथोरिटीेने (एजीसीएम) गुगलला दिला आहे. प्रत्येक दुसर्या स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणार्या ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉइडला मिळालेल्या एकाधिकाराचा दुरुपयोग करून गुगलने स्पर्धा संपविण्याचा प्रयत्न केल्याचे एजीसीएमने म्हटले आहे.
आपल्या गुगल प्ले अॅपचासुद्धा गैरवापर करून युजर्सपर्यंत पोहोचणे मर्यादित करून टाकले आहे, असा ठपका एजीसीएमने ठेवला आहे. मात्र एजीसीएमच्या आदेशाला विरोध करून गुगलने त्याविरोधात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
काय आहे प्रकरण
इटलीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. या वाहनांसाठी इटलीसह युरोपिय संघांत ९५ हजार सार्वजनिक चार्जिंग स्टेशन बनविले आहेत. रस्त्यात चार्जिंग संपल्यास या स्टेशनचा लोकांना फायदा झाला आहे. लोकांना अधिक सोय होण्यासाठी इटलीच्या अॅनिल या सरकारी संस्थेची शाखा अॅनिल-एक्सने जूसपास नावाते अॅप बनविले. मात्र गुगलने या अॅपला आपल्या व्यासपीठावर चालविण्यास परवानगी दिली नाही. त्यावर गुगलने गेल्या दोन वर्षांपासून जूसपासला चालविण्यास परवानगी दिली नसल्याची तक्रार एजीसीएमकडे करण्यात आली. चौकशीत तथ्य आढळल्यानंतर गुगलने अॅपला परवानगी नाकारून योग्य केले नाही, असे एजीसीएमने म्हटले आहे.