अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
युझर्सच्या सोयीसाठी गुगलने नवीन फीचर्स आणले आहेत. तसेच, गुगलने अनावश्यक फीचर्स बंद केले आहेत. असेच एक वैशिष्ट्य म्हणजे गुगल स्नॅपशॉट. गुगलने आपले लोकप्रिय फिचर गुगल स्नॅपशॉट बंद केले आहे. हे फीचर गुगलने ४ वर्षांपूर्वी २०१८मध्ये सादर केले होते. जे सध्या अँड्रॉईड स्मार्टफोन्समधून काढून टाकण्यात आले आहे. 9to5Google च्या अहवालानुसार, गुगल स्नॅपशॉट वैशिष्ट्य खूप उपयुक्त होते. पण लोकांना या वैशिष्ट्याबद्दल फारच कमी माहिती होती. अशा परिस्थितीत कंपनीने हे फीचर काढून टाकले आहे.
गुगल स्नॅपशॉट वैशिष्ट्य तुमच्या गुगल असिस्टंट स्क्रीनवर इनबॉक्ससारखे दिसत होते. त्यावर क्लिक करून, वापरकर्त्यांना हवामान आणि रहदारी संबंधित माहिती यांसारखी रिअर टाइम माहिती मिळू शकते. गुगल स्नॅपशॉट फीचरच्या मदतीने तुम्ही एका क्लिकवर माहिती मिळवू शकता. यामध्ये स्क्रोल करण्यायोग्य इंटरफेसद्वारे माहिती मिळवता येऊ शकते. हे वैशिष्ट्य गुगलच्या डिस्कवर उपलब्ध होते. या वर्षी एप्रिलनंतर स्मार्टफोनमध्ये गुगल स्नॅपशॉटचा सपोर्ट बंद होईल.
या वर्षाच्या सुरुवातीला गुगलने एक इन – अॅप नोटिफिकेशन जारी करून युजर्सना सूचित केले होते की तुमचा स्नॅपशॉट फीचर लवकरच बंद होणार आहे. मात्र, गुगल स्नॅपशॉट फीचर कोणत्या तारखेपर्यंत बंद होईल, याची माहिती त्यावेळी देण्यात आली नव्हती. मात्र, आता अनेक वेबसाइटवरून गुगल स्नॅपशॉट फीचर बंद करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. गुगलकडून नेहमीच नवनवीन फिचर्स आणण्यात येतात. पण फिचर्स बंद कमी करण्याची वेळ फार कमी वेळा येते. आता गुगल स्नॅपशॉट बंद होत असले तरी त्याऐवजी इतर आकर्षक फिचर युझर्ससाठी उपलब्ध होतील असे गुगलकडून सांगण्यात येत आहे.