शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गुगलचे हे अभ्यासक्रम मिळवून देतील नोकरीची हमखास संधी

by Gautam Sancheti
जून 15, 2022 | 5:38 am
in संमिश्र वार्ता
0
google e1650185116438

 

अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
स्पर्धेच्या युगात नोकरी मिळणे अवघड झाले आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांसाठी विविध प्रकारची कौशल्ये असतात. या कौशल्याच्या अभावामुळे अनेकवेळा उमेदवारांना नोकऱ्या मिळत राहतात. गुगलने मात्र या परिस्थितीला दोष देण्यापेक्षा ही अडचण समजून घेतली आहे. त्यामुळेच गुगल सर्टिफिकेट कोर्सेस त्यांनी सुरू केले आहे. गुगलचे हे सगळे कोर्सेस ऑनलाइन पद्धतीवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम केल्यानंततर कोणत्याही पूर्व अनुभवाशिवाय किंवा विशिष्ट क्षेत्रातील औपचारिक पदवीशिवाय कंपनीत नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे गुगलने म्हटले आहे.

हे अभ्यासक्रम विविध उद्योगांमधील कार्यप्रणाली लक्षात घेऊन उमेदवारांना त्यासाठी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने डिझाइन केलेले आहेत. आयटी ते बिझनेसपर्यंत अनेक विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश असून आपण आपल्या आवडीनुसार त्याची निवड करु शकतो. हे ऑनलाइन कोर्स विद्यार्थ्यांना आणि तरुण व्यावसायिकांना अत्यंत मदतीचे आहेत. विशेष म्हणजे हे अभ्यासक्रम पूर्ण करताना कोणतीही स्पर्धा नाही. आपण आपल्या गतीने अभ्यासक्रम पूर्ण करु शकतो. कमी कालावधीत नवीन क्षेत्राची माहिती देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. गुगलसारख्या प्रतिष्ठीत कंपनीचे हे कोर्सेस असल्याने नोकरी मिळण्यास नक्कीच मदतीचे होऊ शकणार आहे. व्यावसायिक प्रशिक्षण देणारे हे अभ्यासक्रम विविध एडटेक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. कोर्स पूर्ण केल्यानंतर गुगलकडून प्रमाणपत्र देण्यात येते.

असे आहेत अभ्यासक्रम..
1. Google UX Design Professional Certificate

Google UX डिझाइन प्रोफेशनल प्रमाणपत्र कोर्सद्वारे एक्सपिरिअन्स डिझायनर, युझर इंटरफेस डिझायनर तसेच व्हिज्युअल डिझायनर बनण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येतं. कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला पदवी किंवा कोणत्याही पूर्व अनुभवाची आवश्यकता नाही. यामध्ये वायरफ्रेम, लो-फिडेलिटी प्रोटोटाइपिंग, UX संशोधन कसे करायचे आदी माहिती देण्यात येणार आहे. हा २०० तासांचा स्टडी प्रोग्राम आहे.

2. Google Project Management Professional Certificate
हा सुमारे १४० तासांचा स्टडी प्रोग्राम आहे. सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत एंट्री-लेव्हल प्रोजेक्ट मॅनेजमेंट रोलमध्ये सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य यामार्फत शिकायला मिळतात. प्रोजेक्टची निर्मिती, योजना, प्रत्यक्ष अंमलबजावणीविषयी यात शिकायला मिळू शकतं. यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजर, स्क्रम मास्टर्स, प्रोग्राम मॅनेजर आणि प्रोजेक्ट अॅनालिस्ट्सच्या जबाबदाऱ्यांचा समावेश आहे.

3. Google Data Analytics Professional Certificate
Google Data Analytics Professional Certificate यातून व्यवसायाचे निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी डेटावर प्रक्रिया आणि विश्लेषण करण्याचे प्रशिक्षण मिळू शकतं. कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नसली तरी, व्यवस्थित आकलनासाठी Google Analyticची मुलभूत माहिती असणे या अभ्यासक्रमासाठी गरजेचे आहे. असोसिएट डेटी एनॅलिस्ट, डेटा तंत्रज्ञ आणि मार्केटिंग एनॅलिस्ट यांसारख्या भूमिकांसाठी कौशल्य यामार्फत मिळू शकतं. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तुम्हाला प्रत्येक मूल्यांकनावर ८० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळणे आवश्यक आहे.

4. Associate Android developer certificate
हा कोर्स गुगलने ऑफर केला आहे. हा कोर्स कोटलिन प्रोग्रामिंग भाषेच्या मूलभूत गोष्टी आणि Android अॅप्स विकसित करणे, चाचणी करणे आणि डीबग करणे यासाठी आवश्यक गोष्टी शिकवतो. येथे तुम्ही अँड्रॉइड कोअर, यूजर इंटरफेस, डेटा मॅनेजमेंट, डीबगिंग आणि टेस्टिंग यासारखे आवश्यक विषय शिकाल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील सर्व तालुक्यात उभारणार हे सभागृह; राज्य सरकारचा निर्णय

Next Post

आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा! आता तालुकास्तरावरच उपलब्ध होणार रक्त

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Next Post
70 e1655263976818

आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा! आता तालुकास्तरावरच उपलब्ध होणार रक्त

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011