इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सेलिब्रिटीज त्यांचे आयुष्य, त्यांचे रोजचे जगणे याबद्दल सामान्य माणसांना कायमच आकर्षण असते. त्यामुळेच त्यांच्या बद्दलच्या बातम्या या फारच इंटरेस्टने वाचल्या जातात. त्यांच्या वैयक्तिक माहितीसाठी त्यांची सोशल मिडीया पेजेस फॉलो केली जातात. नुकतंच आपलं वडिलोपार्जित घर विकल्याने चर्चेत आलेले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई हे स्वतः कोणता मोबाईल वापरत असतील याची सर्वांना आणि त्याहीपेक्षा गुगल फोनचे चाहते असलेल्यांना उत्सुकता आहे. आपण कोणता फोन वापरतो याचा खुलासा स्वतः पिचाई यांनी केला आहे. पिचाई यांच्या या मुलाखतीच्या या व्हिडीओला २.५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
पिचाई कोणता फोन वापरतात?
साहजिक आहे, पिचाई आज ज्या पदावर काम करतात, तिथे ते केवळ एक मोबाईल वापरणे हे काही शक्य नाही. आपल्या मोबाईलची माहिती देताना पिचाई यांनी एका नाही तर ३ ते ४ वेगवेगळ्या फोन्सची नावं घेतली आहेत. भारतीय युट्यूबर अरूण मानी याला पिचाई यांनी नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. नुकताच लॉन्च झालेला गुगलचा पिक्सल फोल्ड (Google Pixel Fold) फोन आपण वापरत असल्याचे पिचाई म्हणाले.
आवडता फोन
आपला आवडता फोन हा गुगल पिक्सल 7 प्रो (Google Pixel Pro) असल्याचे ते म्हणाले. तर गूगल फोनमधील वेगवेगळी फीचर्स कशा पद्धतीने काम करतात हे पाहण्यासाठी त्यांच्याकडे सॅमसंग गॅलेक्सी आणि आयफोन देखील आहे. प्रवासात पिक्सल फोल्डऐवजी पिक्सल 7 प्रो वापरण्यास प्राधान्य देतो असंही पिचाई सांगतात. यामागील मुख्य कारण म्हणजे पिक्सल 7 प्रो हा वजनाने हलका आहे. टेस्टिंगसाठी मागील बऱ्याच काळापासून आपण पिक्सल फोल्डचा वापर करत असल्याचं पिचाई म्हणाले.
फोनची वैशिष्ट्ये
गुगल पिक्सल फोल्ड नावाने लाँच करण्यात आलेल्या या फोनची किंमत १७९९ अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलनानुसार ही किंमत जवळपास दीड लाख आहे. हा फोन फोल्ड असताना ५.८ इंचाचा असतो. अनफोल्ड केल्यावर या फोनचे रूपांतर एका टॅबमध्ये होतो, ज्याची स्क्रीन ७.६ इंचांची असते. व्हिडीओ गेम खेळण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठी, फाइल एटीड करण्यासाठी यामुळे युझर्सला मोठी स्क्रीन उपलब्ध होते.
Google CEO Sundar Pichai Smartphone