मुंबई – गुगल आणि युट्यूबशिवाय सर्वसामान्य लोकांचा एकही दिवस जात नाही. त्यामुळे यापैकी एक जरी बंद राहणार म्हटले तर टेंशनच यायचे. पण आता २.३.७ किंवा त्यापेक्षा जुन्या अँड्रॉईड मॉडेलवर गुगलचे कुठलेही अॅप चालणार नाहीत. म्हणजेच, गुगल, जीमेल, युट्यूब सारखी अन्य अॅप बंदच राहतील, पुढील महिन्यापासून हे लागू होणार आहे.
गुगलने एका इ-मेलद्वारे हे स्पष्ट केले आहे की २७ सप्टेंबरपासून या डिव्हाईसवर गुगल अॅपच्या माध्यमातून त्यच्याशी संबंधीत इतर अॅपव साईन-इन करता येणार नाही. इ-मेलमध्ये युझर्सला सल्लाही देण्यात आला आहे की एकतर फोन अपडेट करा किंवा नवा फोन घ्या. २७ सप्टेंबरपासून जुन्या मॉडेलवर जीमेल, गुगल सर्च, गुगल ड्राईव्ह आणि युट्यूबसह कोणतेच गुगल अॅप सुरू होणार नाही.
सोशल मिडीयावर गुगलच्या या इ-मेलचा स्क्रीनशॉटही व्हायरल झाला आहे. २७ सप्टेंबरनंतर युझरने जुन्या मॉडेलवर गुगल एप सुरू करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना युजरनेम आणि पासवर्ड एरर दाखविण्यात येईल. अर्थात एवढ्या जुन्या व्हर्जनसाठी गुगलने हा निर्णय घेतला आहे की अत्यंत कमी लोकांना त्याचा फटका बसणार आहे.
कारण गेल्या चार वर्षांत स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या तर वाढलीच, शिवाय आधीपासून ज्यांच्याकडे स्मार्टफोन होते त्यांनीसुद्धआ आपले फोन अपडेट करून घेतले आहेत. गुगलने युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे सांगितले आहे. युझर्स एक नवे गुगल अकाऊंट सुरू करण्याचा प्रयत्न करतील किंवा फॅक्ट्री रिसेट करण्याचा प्रयत्न करतील, तरीही त्यांना एररच दिसणार आहे. सोबतच सर्व डिव्हाईसवरून ते साईन-आऊटही होतील.