इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजकाल फोन चोरीला जाणे किंवा गहाळ होणे ही एक सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. यामुळे केवळ आपल्या पैशाचे नुकसान होत नाही, तर आपली वैयक्तिक माहिती लीक होण्याचा धोकाही वाढतो. कारण बँकिंगसह अनेक महत्त्वाची कामे स्मार्टफोनवरून केली जातात. योग्य काळजी घेतली नाही तर फोन चोरीला जाण्याच्या अनेक प्रकारांना सामोरे जावे लागू शकते. एक सामान्य प्रथा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यासाठी फोन टिप्स आणि युक्त्या वापरणे आवश्यक आहे.
फोन चोरीला जाण्यापासून रोखण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही. पण आता फोन चोरीला गेला असेल तर तो नक्कीच परत मिळू शकतो. कारण त्यासाठी गुगल तुम्हाला या कामात मदत करू शकते. गुगल प्ले स्टोअरवर गुगल फाइंड माय डिव्हाईस हे अॅप आहे, जे तुम्हाला चोरीला गेलेला फोन शोधण्यात मदत करेल. ते फक्त Android डिव्हाइसवर कार्य करेल. त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या…
तुमचा फोन चोरीला गेल्यास, तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे इतर कोणत्याही स्मार्टफोनवर Google Find My Device अॅप डाउनलोड करा.
– Google Find My Device अॅप हे Google Play Store वर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हे अॅप फक्त 1.8MBचे आहे. हे अॅप 100 दशलक्षापेक्षा जास्त जणांनी डाउनलोड केलेले आहे.
– डाऊनलोड झालेले Google Find My Device अॅप उघडा.
– चोरीला झालेल्या फोनमधील Gmail हे Google Find My Device अॅपमध्ये लॉग इन करा.
– यानंतर चोरीला गेलेल्या फोनचे लाईव्ह लोकेशन कळेल. त्यावरून फोन ट्रॅक करता येईल.
– तसेच तुमच्या फोनमध्ये किती टक्के बॅटरी शिल्लक आहे याचीही माहिती मिळेल.
– Google Find My Device या अॅप मध्ये Play Sound, Secure Device आणि ERASE Device हे तीन पर्याय दिलेले आहेत.
– प्ले साउंड ऑप्शनच्या मदतीने तुम्ही फोनला रिंग देऊ शकता. विशेष म्हणजे, तुम्ही फोन सायलेंट केला तरी तुम्हाला रिंग ऐकायला येईल.
– तसेच सिक्युअर डिव्हाईसच्या मदतीने तुम्ही चोराला मेसेज करून फोन पाठवण्यास सांगू शकता.
– तिसरा पर्याय म्हणजे इरेज डिव्हाईस. ज्यामधून फोनचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि फोल्डर्स डिलीट करता येतात.