इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुगलने आपल्या व्हिडिओ कॉलिंग सेवेत मोठे बदल जाहीर केले आहेत. या बदलांतर्गत, कंपनी Google Duo आणि Google Meet एकत्र करणार आहे. या दोघांच्या विलीनीकरणानंतर कंपनीने पुरवलेल्या व्हिडिओ कॉलिंग सेवेचे नाव गुगल मीट म्हणून ओळखले जाईल. Google Meet चा वापर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि अधिक लोकांशी कनेक्ट होण्यासाठी केला जातो, तर Google Duo एक-एक व्हिडिओ कॉलिंग ऑफर करतो. आता वापरकर्त्यांना दोन्ही सेवांची मजा एकाच अॅपमध्ये मिळणार आहे. नवीन बदलांसह, Duo अॅपचे वापरकर्ते Google Meet च्या सर्व वैशिष्ट्यांचा आनंद घेऊ शकतील.
गुगल वर्कस्पेसचे सरव्यवस्थापक आणि उपाध्यक्ष जेवियर सोलटेरो म्हणाले, “दोन अॅप्स एकत्र केल्याने, वापरकर्त्यांना एकाच ठिकाणी व्हिडिओ कॉलिंग आणि मीटिंगची सुविधा मिळेल.” या वर्षाच्या अखेरीस Google Duo अॅपचे नाव बदलून Google Meet केले जाईल. याचा वापर Google प्लॅटफॉर्मवर एकल व्हिडिओ कॉलिंग सेवा म्हणून केला जाईल आणि वापरकर्त्यांसाठी ती पूर्णपणे विनामूल्य असेल.
Google Duo ला नेहमीच Apple च्या FaceTime व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलिंग तसेच व्हॉट्सअॅप कॉलिंगचा प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जाते. दुसरीकडे, Google Meet झूम आणि मायक्रोसॉफ्ट टीम्सशी स्पर्धा करते. वापरकर्त्यांना Google Duo मध्ये बरेच चांगले फिल्टर देखील मिळतात. ड्युओ आणि मीट एकत्र झाल्यानंतर हे फिल्टर उपलब्ध होतील की नाही, हे निश्चितपणे सांगता येणार नाही.
मीट आणि डुओच्या विलीनीकरणानंतर, डुओला मीट म्हणून देखील ओळखले जाईल. दुसरीकडे, Google Meet अॅपचे नाव Meet Original असे बदलले जाईल. गुगल मीटमधील नवीन अपडेट्सनंतर, अनेक व्हिडिओ कॉलिंग टूल्स उपलब्ध होतील. यामध्ये आभासी पार्श्वभूमी, प्रकाश समायोजन आणि आवाज कमी करणे समाविष्ट आहे.