नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. येत्या १६ मार्चपासून १२ ते १४ वर्षे वयोगटातील लहान बालकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरू केली जाणार आहे. तसेच, ६० वर्षे वयापुढील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा बुस्टर डोस दिला जाणार आहे.
देशभरात सध्या कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देशामध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी राहिली. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी लस हे प्रभावी शस्त्र आहे. देशात कोरोना लसीकरण मोहिम ही मोफत राबविली जात आहे. पहिला आणि दुसरा डोस त्यात दिला जात आहे. आतापर्यंत १२ ते १४ वर्षे वयापुढील बालकांसाठी कोरोना लस उपलब्ध नव्हती. ती आता उपलब्ध झाली आहे. तसेच, बुस्टर डोस हा केवळ फ्रंटलाईन वर्कर यांनाच दिला जात होता. आता तो सर्व ज्येष्ठांना मिळणार आहे.
बच्चे सुरक्षित तो देश सुरक्षित!
मुझे बताते हुए खुशी है की 16 मार्च से 12 से 13 व 13 से 14 आयुवर्ग के बच्चों का कोविड टीकाकरण शुरू हो रहा है।
साथ ही 60+ आयु के सभी लोग अब प्रिकॉशन डोज लगवा पाएँगे।
मेरा बच्चों के परिजनों व 60+ आयुवर्ग के लोगों से आग्रह है की वैक्सीन जरूर लगवाएँ।
— Dr Mansukh Mandaviya (मोदी का परिवार) (@mansukhmandviya) March 14, 2022