नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) – सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेचा प्रवास हा सुखकर मानला जातो, परंतु त्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे रेल्वेचे टिकीट बुक करणे होय. सध्याच्या काळात त्यात अधिकच अडचणी निर्माण होत असतात, परंतु आता यापुढे रेल्वे प्रवासी या महिन्यापासून चालत्या गाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट ऑनलाइन बुक करू शकतील.
महत्त्वाचे महत्त्वाचे रेल्वेने मेल-एक्स्प्रेस, दुरंतो, जनशताब्दी, गरीब रथ, वंदे भारत यासह २८८ गाड्यांची यादी जाहीर करून ऑनलाइन तिकीट तपासणीची प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन सुविधेअंतर्गत, एसी-१, २, ३ आणि ट्रेनमधील स्लीपरमधील रिकाम्या बर्थची माहिती पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम (पीआरएस), आयआरसीटीसी वेबसाइट आणि संबंधित खासगी कंपन्यांच्या मोबाइल अॅपवर उपलब्ध असेल.
विशेषतः देशभरातील २८८ गाड्यांमध्ये हँड हेल्ड टर्मिनल (HHT) यंत्राद्वारे तिकीट तपासणी प्रणाली लागू करण्यासाठी रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेंना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व रनिंग तिकीट निरीक्षकांना (TTEs) HHT उपकरणे जारी करण्यात आली आहेत.
या संदर्भात एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, जुलैच्या अखेरीस, राजधानी-शताब्दीसह सर्व २८८ ट्रेनमध्ये HHT वरून तिकीट तपासणी करणे अनिवार्य केले जाईल. HHT मधील रिक्त बर्थची माहिती IRCTC वेबसाइट आणि रेल्वे स्थानकांच्या PRS सह इतर संबंधित मोबाइल अॅप्सवर उपलब्ध असेल. HHT कडून तिकीट तपासणी TTE ला RAC आणि वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
good news train ticket booking confirm