मुंबई – महाविकास आघाडी सरकारने राज्यातील महिला पोलिसांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत महिला पोलिसांनाही पुरुष पोलिसांप्रमाणे सलग १२ तास काम करावे लागते. मात्र, यापुढे महिला पोलिसांना सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, महिला पोलिसांना आता केवळ ८ तासच ड्युटी करावी लागणार आहे. त्याची माहिती पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे महिला पोलिसांना आपल्या कुटुंबाला योग्य वेळ देणेही शक्य होणार आहे.
https://twitter.com/ANI/status/1441273208578076673
https://twitter.com/supriya_sule/status/1441279396656996353