विशेष प्रतिनिधी, मुंबई
रिलायन्स जिओ, भारतातील आघाडीच्या टेलिकॉम ऑपरेटरने महाराष्ट्र आणि गोव्याच्या एकाधिक कनेक्टिव्हिटी बँडमध्ये नुकत्याच अधिग्रहित केलेल्या अतिरिक्त स्पेक्ट्रम यशस्वीरित्या कार्यान्वित केला आहे, ज्यामुळे एकूणच कनेक्टिव्हिटी आणि ग्राहकांच्या अनुभवात लक्षणीय वाढ झाली आहे.
रिलायन्स जिओने नुकतीच 2300 मेगाहर्ट्झमध्ये अतिरिक्त 10 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम मिळविला होता आणि महाराष्ट्र परवाना सेवा क्षेत्रातील 1800 मेगाहर्ट्झ व 850 मेगाहर्ट्झ बँडमध्ये प्रत्येकी 5 मेगाहर्ट्झ बँड मिळविला होता ज्यात केंद्र सरकारने केलेल्या स्पेक्ट्रम लिलावाच्या अंतिम फेरीमध्ये गोवाचा समावेश आहे.
रिलायन्स जिओने आता महाराष्ट्र आणि गोवा टेलिकॉम सर्कलमधील पात्र 26000+ सेल साइटवर हा अतिरिक्त बँडविड्थ कार्यान्वित केला आहे. जिओ आपल्या व्यावसायिक लॉन्चच्या अवघ्या 4.5 वर्षात कस्टमर मार्केट शेअर आणि रेव्हेन्यू मार्केट शेअर मध्ये महाराष्ट्रात अग्रेसर आहे.
सध्याची लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता अतिशय योग्य वेळी स्पेक्ट्रम तैनात केला गेला आहे. ऑनलाइन क्लास आणि घरून काम करणारे तसेच इतर असंख्य जिओ ग्राहकांना याची लक्षणीयरीत्या मदत होणार आहे. या व्यतिरिक्त वाढीव कनेक्टिव्हिटी वेग आरोग्याच्या क्षेत्रातील आणि इतर क्षेत्रातील फ्रंटलाईन वर्कर्स साठी हा अतिरिक्त स्पेक्ट्रम वरदान ठरणार आहे .
सध्या रिलायन्स जिओचे महाराष्ट्र आणि गोआ मध्ये 3.7 कोटीहून अधिक ग्राहक आहेत आणि नेटवर्कमध्ये अधिकाधिक ग्राहक जोडण्याचे आमचे ध्येय आहे. भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटरने आताच्या ग्रामीण आणि शहरी भौगोलिक क्षेत्रातील आपल्या 4 जी नेटवर्कमध्ये ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणात वाढीस आधार म्हणून पुढील काही महिन्यांत अतिरिक्त 35% सेल साइट्सद्वारे आपल्या 4 जी नेटवर्कचा विस्तार करण्याची योजना आखली आहे. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की या अतिरिक्त नियोजित साइटच्या रोलआउटमुळे महाराष्ट्र आणि गोआ च्या 96% खेड्यांमध्ये आणि 98 % एकूण भौगोलिग क्षेत्रामध्ये जीओची 4जी कनेक्टिव्हीटी पोहोचण्यास मदत होणार आहे..
रिलायन्स जिओने अलीकडील स्पेक्ट्रम लिलावात 20 वर्षांच्या कालावधीसाठी 22 मंडळासाठी एकूण 488.35MHZ (850MHZ, 1800MHZ आणि 2300MHZ समाविष्ट) स्पेक्ट्रम मिळविला. यासह, जिओने त्याच्या फूटप्रिंटमध्ये मध्ये 55% इतकी वाढ केली आहे आणि एकूण 1717 मेगाहर्ट्झ पर्यंत वाढ केली आहे. जिओचे सध्या 426 दशलक्ष ग्राहक आहेत आणि या अतिरिक्त स्पेक्ट्रम फूटप्रिंटमुळे जिओ आपल्या विद्यमान वापरकर्त्यां ना अधिक वेगवान सेवा देण्यासाठी नेटवर्क क्षमता वाढवता येईल. या वर्धिततेमुळे पुढील 300 दशलक्ष वापरकर्ते जोडण्यास जीओला मदत होईल जे डिजिटल सेवांमध्ये जातील सामावले जातील तसेच 5जी सेवांमध्ये देखील मायग्रेट होतील .