अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
तुम्ही जर नोकरदार असाल तर तुमच्यासाठी अतिशय झक्कास बातमी आहे. सर्व कर्मचारी हे एकाच गोष्टीची सर्वाधिकवाट पाहतात ती म्हणजे पगारवाढ. कारण, त्यावरच त्याचा आगामी काळ आणि नियोजन अवलंबून असते. त्यामुळे तुम्हाला खुश करणारे वृत्त आहे. कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी बहुतांश कंपन्या पुढच्या वर्षी पगारात १० टक्के इन्क्रिमेंट देण्याची शक्यता आहे. एका अहवालातून ही बाब समोर आली आहे.
अनेक कंपन्या सध्या एट्रिशेन रेटशी (कर्मचारी सोडून जाण्याचा दर) लढा देत आहेत. म्हणजेच कर्मचाऱ्यांची घटत्या संख्येचा सामना सध्या सर्व कंपन्या करत आहे. ट्रेनी किंना नवे कर्मचारी कंपनी जॉईन करतात परंतु, काही काळानंतर लगेचच ते दुसऱ्या एखाद्या कंपनीत जात आहेत. त्यामुळे कंपन्यांच्या परफॉर्मन्सवर या सगळ्याचा मोठा परिणाम होतो आहे. हा एट्रिशेन रेट रोखण्यासाठी, कर्मचाऱ्यांना खुश करणे गरजेचे आहे हे ओळखत २०२३ साली सगळ्याच कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारांत १० टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. विलिर्स टॉवर्स वॉटसनच्या सॅलरी बजेट प्लँनिंग रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील कंपन्याही १० टक्के पगारवाढीच्या दृष्टीनेच या वर्षीच्या बजेटवर काम करीत आहेत. या बदलामुळे पुढच्या वर्षी कर्मचाऱ्यांना १० टक्के इन्क्रिमेंट मिळाले तर ते गेल्या वर्षीपेक्षा ०.५ टक्क्यांनी जास्त असेल. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांचे पगार साधारणपणे ९.५ टक्क्यांनी वाढले होते. या अहवालानुसार भारतातील सुमारे ५८ टक्के कंपन्या या पगार वाढवण्याच्या बजेटवर काम करीत आहेत. देशातील २४.४ टक्के कंपन्या अशा आहेत की ज्या पगारवाढीबाबत कोणताही विचार करीत नाहीत. तर देशातील ५.४ टक्के कंपन्या अशा आहेत की ज्यांनी २०२१ – २२ ज्या तुलनेत यावर्षीच्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे.
पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ साली भारतातील कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात १० टक्के वाढ करु शकतात. चीनमध्ये ६ टक्के, सिंगापूरमध्ये ४ टक्के, हाँगकाँगमध्ये ४ टक्के वाढण्याची शक्यता आहे. ४२ टक्के कंपन्यांनी पुढच्या वर्षात कंपन्या चांगला व्यवसाय करीत असा अंदाज व्यक्त केलेला आहे. म्हणजेच या कंपन्यांच्या नफ्यात वाढ होणे अपेक्षित आहे. ७.२ टक्के कंपन्यांना तोटा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आयटी, इंजीनिअरिंग, सेल्स, टेक्निकल, स्कील ट्रेन्ड या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात ही वाढ होऊ शकते.
Good News for Employees Salary Increment
Study Report Companies Coming Year