नवी दिल्ली – व्हॉट्सअॅप ही सध्या अत्यंत गरजेची गोष्ट झाली आहे. कामाच्या ग्रुपवर सातत्याने काही न काही अपडेट, निरोप पडतच असतात. अनेकदा तर सारखा मोबाइल हाताळायला नको, म्हणून डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरूनच व्हॉट्सअॅप वेबचा पर्याय स्विकारत तिथे हे ऍप सुरू केले जाते. लोकांची ही गरज लक्षात घेऊनच लॅपटॉप आणि डेस्कटॉपसाठी म्हणून व्हाट्सऍपने एक नवीन ऍप्लिकेशन लाँच केले आहे. या नवीन ऍप्लिकेशनमुळे डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप वापरणे अत्यंत सोयीचे होणार आहे. शिवाय यासाठी सतत व्हॉट्सअॅप वेब सर्च करण्याची गरज नाही.
डाऊनलोड कसे कराल?
डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर तुम्ही व्हाट्सऍप वेब पेज सर्च करा. तिथे तुम्हाला WhatsApp web and desktop हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केलं की आणखी एक पेज ओपन होईल. तिथे डाऊनलोडचा पर्याय असेल. 164 एमबीची ही फाईल डाऊनलोड झाली की इंस्टॉल करा. यानंतर तुम्ही कधीही व्हॉट्सअॅप डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर वापरू शकता. तुम्ही टूल बारमध्ये ते पिनही करून ठेवू शकता.
डेस्कटॉप आणि लॅपटॉपसाठी एखादे स्वतंत्र ऍप्लिकेशन असावे अशी युजर्सची बऱ्याच काळापासून मागणी होती. ती कंपनीने पूर्ण केली आहे.