सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिवाळीपूर्वी ६ कोटी भारतीयांना मिळणार ही गुडन्यूज

by India Darpan
सप्टेंबर 7, 2021 | 12:05 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
good news e1630996501177

 

नवी दिल्ली – सणासुदीच्या दिवसांमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या सहा कोटी सदस्यांना आनंदाची बातमी देणार आहे. ईपीएफओकडून दिवाळीपूर्वी २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे व्याज सदस्यांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती दोन वरिष्ठ अधिका-.यांनी दिली आहे.एक अधिकारी म्हणाले, केंद्रीय कर्मचा-यांना आणि निवृत्तिवेतनधारकांना महागाई भत्ता मिळणार आहे. ईपीएओच्या केंद्रीय मंडळाने व्याजात वाढ करण्याची मंजुरी दिली आहे. निवृत्तीवेतन व्यवस्थापनाने अर्थ मंत्रालयाकडे मंजुरी मागितली आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळणे हा प्रोटोकॉल आहे. त्यांच्या मान्यतेशिवाय व्याजदराची रक्कम ईपीएफओ खात्यात क्रेडिट करू शकत नाही, असा काही लोकांचा तर्क आहे. दुसरे अधिकारी म्हणाले, मागील दीड वर्ष पगारदार कर्मचारी आणि मजूर, कामगांरांना खूपच कठिण गेले. ईपीएफओच्या अपेक्षित निधीमुळे त्यांचा मूड चांगला होण्यास मदत होईल. ईपीएफओ मंडळाने २०२१ या आर्थिक वर्षासाठी ८.५ टक्के व्याजानुसार पैसे देण्याची शिफारस केली होती.

सात वर्षात सर्वात कमी व्याजदर
गेल्या आर्थिक वर्षात ईपीएफओने जवळपास ७० हजार ३०० कोटी रुपयांच्या मिळकतीचा अंदाज लावला आहे. त्यामध्ये त्यांच्या शेअरच्या एका भागाची विक्री केल्यास ४ हजार कोटी रुपयांच्या मिळकतीचा समावेश आहे. २०२० मध्ये कोविड-१९ प्रादुर्भावामुळे ईपीएफओने मार्च २०२० मध्ये पीएफ व्याजदर घटवून ८.५ टक्के इतके केले होते. गेल्या सात वर्षांमधील हा सर्वात कमी व्याजदर आहे.

खासगी कंपन्यांकडूनही तयारी
केंद्र आणि राज्य सरकारतर्फे कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना महागाई भत्ता दिल्यानंतर खासगी कंपन्यासुद्धा दिवाळीत कर्मचा-यांना मोठा बोनस देण्याची तयारी करत आहेत. गेले दोन वर्ष कंपनी आणि कर्मचा-यांसाठी खूपच कठीण होते. यावर्षी परिस्थितीत सुधारणा झाल्याने आम्ही कर्मचा-यांना बोनस देण्याचे नियोजन करत आहोत. सर्वकाही सुरळीत चालल्यास कर्मचा-यांना आनंद देण्याचा क्षण निश्चित येणार आहे, असे अनेक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्ह्यात ९४० कोरोना रुग्ण; महानगरपालिका क्षेत्रात ४५० तर पंधरा तालुक्यात ४८३ रुग्ण

Next Post

देशातील कोरोना रुग्ण,लसीकरण व पॅाझिटिव्हिटी रेटची ही आहे स्थिती

India Darpan

Next Post
संग्रहित फोटो

देशातील कोरोना रुग्ण,लसीकरण व पॅाझिटिव्हिटी रेटची ही आहे स्थिती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
Screenshot 20250623 163319 Facebook

कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते…सुनील केदार यांची पोस्ट चर्चेत

जून 23, 2025
Audi India Q7 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 23, 2025
Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011