गोंदिया (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या टोमॅटो चांगलाच भाव खात आहे. प्रत्येक शहरात टोमॅटोच्या दरामुळे सामान्यांचा चेहरा लालबुंद होत आहे. अशात काही चोरट्यांनी टोमॅटो चोरल्याची अजब घटना घडली आहे.
टोमॅटोच्या वाढलेल्या दराने सामान्य नागरिक त्रस्त आहे. अशात एका अजब घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या सर्वत्र भाजी बाजारातील दरपत्रक बघितल्यास भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातत टोमॅटो सर्वाधिक भाव खाऊन जात आहे हे दिसून येत आहे. टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याचे लक्षात येताच चाेरट्यांची त्याच्यावर नजर पडली. गोंदियातून तब्बल ४०० किलो टोमॅटो चोरीस गेल्याची घटना घडली आहे.
गोंदिया भाजी बाजारात गुरुवारी टोमॅटो १०० रुपये ते १२० रुपये विक्री केला गेला. अश्याच एका दुकानात किरकाेळ विक्री करिता खरेदी करून ठेवलेला २० केरेट टोमॅटो आणि इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा चोरांनी भाजी बाजारातील दुकानातून चोरून नेल्याची घटना गोंदिया भाजी बाजारात घडली. सर्वत्र भाजी बाजारात या घटनेची चर्चा इतर भाजी विक्रेते करीत होते. या संदर्भात फिर्यादी बबन उर्फ (बब्बू) गंगभोज यांनी टोमॅटो चोरीची घटनेची तक्रार गोंदिया शहर पोलिस ठाण्यात दिली. पोलिस टोमॅटो चोरांचा शोध घेत आहेत.
सामन्यांनी व्यक्त केले आश्चर्य
गोंदिया भाजी बाजारात गुरुवारी टोमॅटो १२० रुपये ते १५० रुपये विक्री केला गेला. अश्याच एका दुकानात चिल्लर विक्री करिता खरेदी करून ठेवलेला २० कॅरेट टोमॅटो आणि इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी भाजी बाजारातील दुकानातून चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेवर सामान्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.