विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
दागिने खरेदी करण्यापूर्वी बहुतांश सगळेच लोक सोन्या-चांदीचे भाव पाहतात. सोन्याचे भाव पाहण्यासाठी आता तुम्हाला कोणालाच विचारायची गरज पडणार नाही. २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ भाव जाणून घेण्यासाठी तुम्हाला ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही सेकंदातच एसएमएसच्या माध्यमातून तुम्हाला सोन्या-चांदीचे ताजे भाव मिळतील. हे रेट प्रति ग्रॅमच्या दरानुसार असतील. त्यामध्ये जीएसटी आणि मजुरीच्या दरांचा समावेश नसेल.
दर कोणाकडून जारी
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) या संघटनेचा हा क्रमांक आहे. सॉवरेन गोल्ड बाँडची किंमत याच संघटनेच्या दराच्या आधारावर रिझर्व्ह बँकेकडून जारी केली जाते. आयबीजेएकडून जारी करण्यात आलेले दर देशभरात सर्वमान्य आहेत. या वेबसाइटवर दिल्या गेलेल्या दरांमध्ये जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही.
सोने खरेदी-विक्री करताना तुम्ही आयबीजेएच्या दराचा संदर्भ देऊ शकता. देशभरातील १४ केंद्रांतून सोने-चांदीचा ताजा दर गोळा करून आयबीजेएकडून त्याचे सरासरी मूल्य सांगितले जाते. सोन्या-चांदीचे ताजे दर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. त्यांच्या किमतींमध्ये थोडा फरक असू शकतो.