२०२२ मध्ये सोन्याची झळाळी फिकी पडली; कारण….
– प्रथमेश माल्या, उपाध्यक्ष (एंजल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन)
सोने हा कायमच तुमच्या गुंतवणूकीच्या पोर्टफोलिओमध्ये एक चांगले वैविध्य आणणारा दीर्घकालीन गुंतवणूकीचा पर्याय मानला गेला आहे, कारण कोणत्याही गुंतवणूकदाराने सोन्यामध्ये केलेल्या गुंतवणूकीतून मिळणारे रिटर्न्स हे त्या गुंतवणूकदाराने घेतलेल्या एकूण जोखमीची पुरेपूर भरपाई करून देतात. असे असले तरीही २०२२ मध्ये जागतिक अनिश्चितता आणि रशिया-युक्रेन युद्ध, जागतिक सेंट्र्ल बँकांनी व्याजदरात झपाट्याने केलेली वाढ, डॉलरची किंमत आणखी वधारणे, एक्स्चेंज ट्रेडेड फंड्समधून झालेला आउटफ्लो अशी अनेक कारणे असूनही गुंतवणुकदारांना त्यांच्या गुंतवणूकींवर फारसा चांगला परतावा मिळाला नाही.
वाढत्या महागाईपासून हमखास वाचविणारे संरक्षक कवच असा नावलौकिक असलेल्या सोन्याच्या दरात ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत सलग सात महिने घसरण होत राहिली. वर्ष सुरू झाल्यापासून ते १० ऑक्टोबर २०२२ पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत सुमारे ९ टक्क्यांनी घसरली आहे. याच कालावधीमध्ये गोल्ड फ्युचर्सच्या किंमती सुमारे ६ टक्क्यांनी वधारल्या असताना एमसीएक्समधील डॉलर रुपया समीकरणाने (रुपयाचे सुमारे १०% अवमूल्यन झाले) गुंतवणुकदारांना वाचविले.
म्हणून बिघडले गणित
वर्ष २०२२ च्या पहिल्या चार महिन्यांमध्ये गोल्ड ईटीएफ’ज मध्ये ३००t हून अधिक इन्फ्लो (US$१९bn) झाल्याचे दिसले. ऑगस्ट महिन्यात जागतिक गोल्ड ईटीएफ’ज नी ५१ टन (US$२.९bn, १.४) आउटफ्लोची नोंद केली, जे किंमतींच्या कामगिरीबरहुकुम होते. आउटफ्लोजची नोंद होण्याचा हा सलग चौथा महिना होता. या फंड्सनी आता एप्रिलच्या संपूर्ण महिन्यामध्ये साठलेल्या इनफ्लोजपैकी दोन-तृतीयांश परत केले आहे; सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा सोन्याच्या साठ्यात आणखी ९५ टनांची घसरण झाली (US$५bn) तेव्हा जागतिक गोल्ड ईटीएफ’ज नी सलग पाचव्या महिन्यात नेट आउटफ्लोची नोंद केली. शिवाय मार्च २०२१ (१०७t) पासूनचा हा सर्वात मोठा आउटफ्लो होता. सप्टेंबर महिना संपेपर्यंत जागतिक गोल्ड ईटीएफ मधील सोन्याचा साठा ३,५४८ टन (US$१९१bn) इतका होता, टनेजनुसार या वर्षाच्या सुरुवातीपासून आजतारखेपर्यंत यात १% घट झाली आहे. दोन दशकांनंतर यूएस डॉलर्सच्या दरात नव्याने झालेली वाढ – त्याजोडीला वधारलेल्या किंमती याही गोष्टी पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतींसाठी अडथळा ठरल्या. (स्त्रोत – वर्ल्ड गोल्ड काउन्सिल).
मॅक्रोजनी सोन्याच्या किंमतींवर स्वार:
यूएसमध्ये व्याजदरातील वाढीचा वेग इतका जास्त कधीही नव्हता आणि शेजारी दिलेल्या तक्त्यामधून हे स्पष्ट दिसून येते. सेंट्रल बँकेने व्याजदरात केलेली वाढ अधिक वेगवान आणि अधिक तीव्र असल्याचे यात दिसते. यामुळे सर्व गुंतवणूकदार डॉलर करन्सीच्या सुरक्षित भूमीच्या शोधात निघाले व परिणामी डॉलर अधिक बळकट झाला.
१० ऑक्टोबर रोजीच्या आकडेवारीनुसार वायटीडी २०२२ मध्ये डॉलर इंडेक्स सुमारे १९ टक्क्यांनी वधारला. डॉलरचे बळकट होणे आणि वस्तूंच्या किंमतीशी त्याच्या असलेल्या व्यस्त सह-संबंधामुळे २०२२ मध्ये सोन्याच्या किंमतीला फटका बसला. रशिया-युक्रेन युद्धामुळे सध्या असलेल्या अनिश्चिततेच्या वातावरणाचीही त्याला मदत झाली नाही.
भारतीयांच्या दृष्टिकोनातून सोने:
चांगला पाऊस सोन्याची मागणी वधारण्याचे शुभसंकेत घेऊन येतो आणि २०२२ सालातील मान्सूनमधील पर्जन्यमानामुळे ग्रामीण भागांमध्ये सोन्याच्या मागणीने वेग धरल्याचे दिसले. (भारतीय हवामान खाते)
वर्ष २०२२ मध्ये भारतातील गोल्ड ईटीएफ’ज मधील इन्फ्लोज वाढीच्या मार्गावर असल्याचे दिसले आणि त्याजोडीला सेंट्रल बँकेने केलल्या खरेदीमुळेही २०२२ वायटीडी मध्ये सोन्याला असलेल्या मागणीने चांगला जोर धरला.
सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत सोन्याच्या किंमतींमध्ये १.८% सुधारणा झाल्याने गुंतवणूकदार पुन्हा एकदा गोल्ड ईटीएफ’ज कडे वळले व या महिन्यामध्ये ०.४t इतका नेट इन्फ्लो झाला. यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सोन्याच्या एकूण साठ्यामध्ये ३८.५t इतकी वाढ झाली. एकूण, भारतीय गोल्ड ईटीएफ’ज मध्ये सप्टेंबर २०२२ मध्ये सुरुवातीपासून आजतारखेपर्यंत ०.९t इतक्या लहान प्रमाणात पण अर्थपूर्ण नेट इन्फ्लो पाहता आला.
भारतीय रुपयाच्या रक्षणार्थ भारतीय रिझर्व्ह बँकेने परकीय चलन बाजारपेठेत केलेल्या हस्तक्षेपामुळे या वर्षामध्ये एकूण रिझर्व्ह्सच्या टक्केवारीत गोल्ड रिझर्व्ह्सचा टक्का (७८२.७t) वाढला. यामुळे FX मधील रिझर्व्ह्समध्ये US$९६bn ची घट होऊन ते सध्याच्या US$५५३bn पर्यंत खाली आले.
जागतिक परिस्थितीकडे पाहता आणि या अहवालात चर्चिल्या गेलेल्या अनेक घटकांचा विचार करता निर्माण होणारा प्रश्न म्हणजे यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही सोने खरेदी करणार का? याचे उत्तर होय असेल तर गुंतवणूकदारांसाठी कोणते बहुविध पर्याय उपलब्ध आहेत आणि पुढील दिवाळीपर्यंत किंमती कशा राहतील.
आम्ही यंदाच्या दिवाळीमध्ये सोने खरेदी करण्याचा सल्ला देऊ कारण एखाद्या व्यक्तीच्या पोर्टफोलिओमध्ये किमान १० टक्के निधी तरी सोन्यातील गुंतवणूकीत वर्ग करणे योग्य आणि दिवाळी हे सुवर्णधातूच्या खरेदीसाठी एक मंगल औचित्य आहे. पुढच्या दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमती (CMP : रु. ५१०००/१० gms) वाढून रु.५६०००/१० ग्रॅमपर्यंत पोहोचतील असा आमचा अंदाज आहे आणि याकडे सोने गाठीशी बांधण्याची संधी म्हणून पाहण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला जात आहे.
Gold Rates Investment Returns 2022 Year Analysis