नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर सोने खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. खरे तर सोने खरेदीदारांसाठी मोठा झटका आहे. कारण, आज १ जुलै पासून मोदी सरकारने सोन्यावरील आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. भारताने सोन्यावरील मूळ आयात शुल्क ७.५% वरून १२.५% केले आहे. म्हणजेच सोन्यावरील आयात शुल्क ५% ने महाग झाले आहे.
गेल्या वर्षी सरकारने अर्थसंकल्पात आयात शुल्क कमी करून ते ७.५ टक्के करण्याची घोषणा केली होती. भारतात सोन्यावर ३% जीएसटी लागतो. एकूणच आता सर्वसामान्यांना सोने खरेदी करणे कठीण झाले आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा आयातदार देश आहे. भारत आपली सोन्याची बहुतांश मागणी आयातीद्वारे पूर्ण करतो, ज्यामुळे रुपयावर ताण येतो. रुपयाची सातत्याने घसरण होत असल्याने त्याचा परिणाम झाला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज ७९ रुपयांचा विक्रमी नीचांक गाठला. आज, MCX वर सोन्याचा भाव जवळपास ३% वाढून ५१,९०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्याचवेळी आज जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
Gold rates increased from today this is the reason