इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोने, चांदीच्या दागिन्यांविषयी बहुतांश जणांना आकर्षण वाटणे साहजिक आहे, विशेषतः महिला वर्गाला सोन्याचे दागिने खूपच आवडतात. शिवाय अनेक जण गुंतवणुकीसाठीही सोन्याला प्राधान्य देतात. त्यामुळे त्या संदर्भातील दर जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४६,२०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती.
गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५७,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ५६,४०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाली होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. मागील आठवड्यात सोन्या-चांदीत घसरण पाहायला मिळाली. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव २२५ रुपयांनी घसरून ५०,७६१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव ५०,९८६ रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्याचप्रमाणे चांदीची चमकही थोडी कमी झाली असून त्याची किंमत ३१५ रुपयांनी घसरून ५४,००९ रुपये प्रति किलो झाली.
गेल्या सप्ताहात व्यवहारात चांदी ५४,३२४ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. तर देशातील किरकोळ बाजारात २२ कॅरेट शुद्धतेचे सोने आज प्रति १० ग्रॅम ५०० रुपयांनी स्वस्त झाले असून २४ कॅरेट शुद्धतेचे सोने प्रति १० ग्रॅम ५५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत २२ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव ५०० रुपयांनी घसरला असून तो ४६,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ५५० रुपयांनी घसरून ५०,७७० रुपयांवर आला आहे.
सध्या सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,२०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,४०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,४३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,४३० रुपये इतका असेल.
शुध्द सोन्यावर हे लिहलेले बघाच
२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते. २२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते. २१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते. १४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.
नाशिक हे शहर सौंदर्य दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये सोन्याचे दर आणि सोन्याचे दागिने याबाबत ग्राहकांमध्ये नेहमीच उत्सुकता आहे. नाशिकमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने खूप पसंत केले जातात. नाशिकमध्ये आज २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,६६३आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ४९, ८५० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती किलोचा दर ५७,००० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.)
Gold Rate Reduce Investor Opportunity Business
Trade Silver