विशेष प्रतिनिधी, मुंबई
सोने खरेदी हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून विशेषतः महिला वर्गाला सोन्याच्या दागिन्याबद्दल विशेष आकर्षण असते. कोरोनाचे निर्बंध राज्यात शिथील झाल्याने सोने खरेदीचे व्यवहार सुरू झाले आहेत. जागतिक बाजारपेठेत गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरामध्ये चढ-उतार होत आहेत, कधी सोन्याच्या दर उच्चांकी झालेला आढळतो, तर काही वेळा दर कमी झालेले आढळतात.
भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतींमध्ये ३ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे येत्या काळात ही किंमत आणखी वाढू शकते, गेल्या वर्षभरात कोरोना काळात सोन्याच्या किंमतींमध्ये नवीन विक्रम नोंदवला गेला असून ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याने उच्चांक गाठला होता. परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर मागील वर्षी सोन्याची किंमत हळहळू कमी झाल्या होत्या. यंदा मात्र सोन्याचे दर पुन्हा वाढून ५० हजारापर्यंत पोहोचले होते. या वर्षी एप्रिल महिन्यात सोने हे ३ ते ४ हजार रुपयांनी महागले आहे.
बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजच्या अंदाजानुसार, २०२१ च्या अखेरीस जागतिक स्तरावर सोन्याची किंमत ही प्रति औंस २०६३ डॉलरपर्यंत जाऊ शकते. कोरोना काळात सोन्याच्या किंमत सातत्याने वाढत आहे. तसेच पुढेही सोन्याची दरवाढ कायम राहणार आहे. गेल्यावर्षी कोरोनामध्ये सोन्याची किंमत सुमारे ३ हजार डॉलरने वाढू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. एक औंस सोन्याचे वजन २८.३४ ग्रॅम इतके असते. यानुसार एक ग्रॅम सोन्याची किंमत ५३०७ रुपये इतका असण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार, सोन्याची किंमत लवकरच ५३ हजार रुपयापर्यंत पोहोचू शकते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा जगातील मोठी बाजारपेठांना याचा फटका बसला आहे. ज्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा एकदा सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. मार्च महिन्यापासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. तर एप्रिल महिन्याचा अंदाज लावायचा झाला तर भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतींमध्ये ३ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे येत्या काळात ही किंमत आणखी वाढू शकते, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.ं