नवी दिल्ली : कोरोना काळात सोन्या-चांदीच्या घरगुती दागिन्यांच्या किंमतीही बुधवारी खाली आल्या. बुधवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम २२९ रुपयांची घसरण झाली. या घसरणीमुळे सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,०७४ रुपयांवर आली आहे. स्थानिक सराफा बाजारात चांदीच्या स्पॉट किंमतीत प्रति किलो ७१७ रुपयांची घसरण झाली. या घसरणीमुळे चांदीचा भाव प्रति किलो ७०,८०७ रुपयांवर झाला आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार जागतिक पातळीवर किंमती घसरल्यामुळे देशांतर्गत बाजारात किंमती खाली आल्या. महत्त्वाचे म्हणजे मागील सत्रात सोन्याचे दर १० ग्रॅम ४७,३०३ रुपयांवर बंद झाले होते. तर स्थानिक सराफा बाजारात चांदीच्या किंमतीत प्रति किलो ७१७ रुपयांची घसरण झाली. या घसरणीमुळे चांदीची किंमत प्रति किलो ७०,८०७ रुपयांवर आला आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, डॉलरच्या मजबुतीमुळे आणि बाँडच्या उत्पन्नात वाढ झाल्याने सोन्याच्या किंमती दडपणाखाली आहेत. तर मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे कमोडिटीज रिसर्च नवनीत दमानी म्हणाले की, बॉन्ड उत्पन्नात वाढ आणि डॉलरच्या वाढीमुळे सोनं सुरक्षित-संपत्ती मालमत्ता म्हणून कमकुवत झाली आहे, त्यामुळे सोन्याच्या किंमती खाली आल्या. तर गुंतवणूकदार देखील यूएस सीपीआयच्या डेटाची प्रतीक्षा करताना दिसले.
तर दुसरीकडे देशांतर्गत वायदा बाजारावर एमसीएक्स एक्सचेंजच्या सोन्याच्या वायदेच्या किंमती बुधवारी पहाटेच्या सुरुवातीच्या व्यापारातून संध्याकाळपर्यंत घसरण दिसून आली. तसेच चांदीचे देशांतर्गत वायदेचे भावही बुधवारी संध्याकाळी ३०० रुपयांपेक्षा कमी घसरले आहेत.