येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लहानपणी आजीने सांभाळ केलेल्या नातवाने एक दिवस सहज बोलतात बोलता मी तुला सोन्याची पैठणी घेईल असे सहज बोलून गेलेला कोल्हापूर येथील अलोक किरण चौगुले हा मोठा झाल्यावर नोकरीला लागला. आजीवर निस्सिम प्रेम असलेल्या आजीचे गेल्या वर्षी निधन झाले. मात्र आजीला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी अलोक आणि त्याच्या वडिलांनी कोल्हापूर येथून थेठ येवला गाठले. सोन्याची जर असलेली पैठणीची मागणी केली. मात्र अशी पैठणी लगेच तयार करणे शक्य नसल्याने त्याने काही दिवस आपले लग्न पुढे ढकले. अखेर सोन्याची जर असलेली चार लाख रुपये किमतीची पैठणी खरेदी केली. ही पैठणी लग्नाच्या दिवशी आजीच्या फोटो समोर ठेऊन आजीला दिलेले वचनपुर्ती अलोक पूर्ण करणार आहे.
Gold Paithani Saree Promise Grand Son