मंगळवार, ऑक्टोबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कोणत्या सोन्यात गुंतवणूक फायदेशीर? फिजिकल की डिजिटल? बघा, तज्ज्ञ काय म्हणताय…

जून 9, 2023 | 5:03 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोने ही भारतीय प्रत्यक्षरित्या खरेदी करणारी मालमत्ता आहे. पण कोविड-१९ नंतर डिजिटायझेशनच्या आगमनामुळे अनेक गुंतवणूकदारांनी डिजिटल मोडमध्ये त्यांच्या गुंतवणूका करणे निवडण्यासोबत पोर्टफोलिओमध्ये विविधता आणली आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या फिजिकल आणि डिजिटल पद्धतींबाबत माहिती देत आहेत एंजल वन लिमिटेडचे डीव्हीपी रिसर्च, नॉन-अॅग्रो कमोडिटीज अँड करन्सी श्री. प्रथमेश माल्या.

फिजिकल गोल्ड:
गुंतवणूकदार निवड करू शकतील असा सर्वात सोपा मार्ग म्हणजे फिजिकल गोल्ड खरेदी करणे. गुंतवणूकदार प्रख्यात ज्वेलरकडून सोन्याचे दागिने किंवा कॉईन्स/बार्स खरेदी करू शकतात.

प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याचे फायदे:
गुंतवूणकदार सोने खरेदी करण्याला मौल्यवान मानत असल्यामुळे फिजिकल गोल्ड खरेदी करतात. ते घरी, स्टोरेज सुविधा किंवा बँक लॉकरमध्ये सोने स्टोअर करू शकतात, ज्यामधून त्यांना मन:शांती मिळते.
गुंतवणूकदाराला उत्पन्न अहवाल, लाभांशामधील बदल आणि व्याज देयके यांबाबत चिंता करण्याची गरज भासत नाही.
लिक्वि‍डीटी: फिजिकल गोल्ड कुठेही संबंधित सुलभतेसह रोख रक्‍कमेमध्ये बदलता येऊ शकते.
हॅक होऊ शकत नाही: तुम्हाला तुमच्याकडे सोन्याची नाणी किंवा दागिने ठेवण्यासाठी इलेक्ट्रिसिटी किंव वीजेची गरज लागत नाही. ते हॅक किंवा डिलीट करता येऊ शकत नाही.
वारसांसाठी आदर्श मालमत्ता: फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार सुलभपणे त्यांची मुले, नातवांकडे गुंतवणूक हस्तांतरित करू शकतात.
पैशांची बचत करण्याचा सोपा मार्ग: फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला भविष्यासाठी पैसे बचत करण्यास मदत होऊ शकते, तसेच दीर्घकाळापर्यंत लक्षणीय परतावा मिळू शकतो.

फिजिकल गोल्ड खरेदी करण्याच्या मर्यादा पुढीलप्रमाणे:
फिजिकल गोल्ड बँक लॉकर्समध्ये ठेवल्यास विशिष्ट टप्प्यासाठी स्टोरेज खर्च असतो.
फिजिकल गोल्ड व्याज/लाभांश यांसारखे कोणतेही स्थिर उत्पन्न देत नाही.
दागिने खरेदी करताना घडणावळचा खर्च येतो, तसेच काही अपव्यय देखील होते.

सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा डिजिटल मोड:
गोल्ड ईटीएफमध्ये (एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स) गुंतवणूक
सार्वभौम सुवर्ण रोखे (सॉवरेन गोल्ड बाँड्स)ची खरेदी

गोल्ड ईटीएफमध्ये (एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स) गुंतवणूक:
निप्पॉन गोल्ड ईटीएफ, एसबीआय गोल्ड फंड, आदित्य बिर्ला सन लाइफ गोल्ड ईटीएफ, इन्व्हेस्को इंडिया गोल्ड ईटीएफ, एचडीएफसी गोल्ड ईटीएफ हे भारतातील अव्वल ५ गोल्ड ईटीएफ आहेत.

गोल्ड ईटीएफ कसे कार्य करते?
एनएसई व बीएसईवर सूचीबीद्ध व व्यापार
रोख विभागात व्यापार
इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सोन्याची खरेदी / रिडिम
रिडिम करताना फिजिकल गोल्ड न मिळता समानुपाती रोख रक्कम मिळते
फिजिकल गोल्ड गुंतवणूकांच्या तुलनेत ईटीएफचा अत्यंत कमी खर्च आहे

गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे :
सोन्याच्या शुद्धतेची हमी दिली जाते
प्रत्येक युनिटला उच्च शुद्धतेच्या फिजिकल गोल्डचे पाठबळ असते
पारदर्शक व रिअल टाइम सोन्याच्या किमती
स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध व व्यापार
सोने ठेवण्याचा कर कार्यक्षम मार्ग, जेथे त्यामधून कमावलेले उत्पन्न दीर्घकालीन भांडवली नफा मानले जाते
संपत्ती कर नाही, सुरक्षा व्यवहार कर नाही, व्हॅट नाही आणि विक्री कर नाही
चोरीची भीती नाही – डीमॅटमध्ये असलेल्या युनिट्स म्हणून सुरक्षित आणि विश्वसनीय. सेफ डिपॉझिट लॉकर शुल्कांवर देखील बचत होते.
ईटीएफ कर्जासाठी संपार्श्विक म्हणून स्वीकारले जातात.
एण्ट्री व एक्झिट शुल्क नाही.

गोल्ड ईटीएफची कशी विक्री करावी/रिडिम करावे:
स्टॉक एक्स्चेंजवर यांची विक्री करता येऊ शकते.
डिमॅट व ट्रेडिंग खाते.
लिक्विडेट झाल्यानंतर सोन्याच्या देशांतर्गत किमतीनुसार देय दिले जाते.
गुंतवणूकदाराकडे ईटीएफमध्ये १ किग्रॅ किंवा विविध पटीत सोने असेल तर एएमसी प्रत्यक्ष स्वरूपात गोल्ड ईटीएफ युनिट्सच्या रिडम्‍प्‍शनला देखील परवानगी देते.

सार्वभौम सुवर्ण रोखे (सॉवरेन गोल्ड बॉड्स)ची खरेदी :
सोन्यामध्ये डिजिटल गुंतवणूकीच्या मार्गांपैकी एक म्हणजे सार्वभौम सुवर्ण रोखे (सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स). भारत सरकारच्या वतीने भारतीय रिव्‍हर्स बँक हे रोखे जारी करते. हे रोखे १ ग्रॅमच्या मूळ युनिटसह सोन्याच्या ग्रॅमच्या पटीत दर्शवली जातात.
रोखेची मुदत ८ वर्षांसाठी असेल, ज्यामध्ये ५व्या, ६व्या, ७व्या वर्षी बाहेर पडण्याचा पर्याय असेल, ज्याचा वापर व्याजाचे देय भरण्याच्या तारखांना केला जाईल. सरकारने वेळोवेळी निर्दिष्ट केल्याप्रमाणे प्रति आर्थिक वर्ष (एप्रिल ते मार्च) किमान मान्य मर्यादा १ ग्रॅम सोने असेल आणि अधिकतम मान्य मर्यादा व्यक्तीसाठी ४ किग्रॅ, एचयूएफसाठी ४ किग्रॅ आणि ट्रस्ट्स व तत्सम संस्थांसाठी २० किग्रॅ असेल.

आयबीजेएने प्रकाशित केलेल्या मागील ३ कामकाजाच्या दिवसांच्या ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या सरासरी अंतिम किंमतीवर आधारित रिडम्‍प्‍शन किंमत भारतीय रूपयांमध्ये असेल. गुंतवणूकदारांना नाममात्र मूल्यावर अर्धवार्षिक देय वार्षिक २.५० टक्के दराने भरपाई दिली जाईल. आरबीआयने अधिसूचित केलेल्या तारखेला जारी केल्याच्या पंधरवड्याच्या आत रोखे स्टॉक एक्स्चेंजवर व्यवहार करता येतील.
या पर्यायांपैकी गुंतवणूकदारांनी त्यांच्या गरजा व रिस्क प्रोफाइलनुसार गुंतवणूक करण्याची निवड केली पाहिजे. आमचा गुंतवणूकदारांना सल्ला आहे की, चांगल्या वैविध्यतेसाठी किमान १० टक्के पोर्टफोलिओ सोन्यामध्ये गुंतवा.

Gold Investment Physical Digital Beneficial

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

अर्बन हीट म्हणजे काय? ते कशामुळे होते? त्याचा आणि आपला काय संबंध आहे?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
Fxk7Lg0X0AMeI r scaled e1686236206331

अर्बन हीट म्हणजे काय? ते कशामुळे होते? त्याचा आणि आपला काय संबंध आहे?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011