इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोने हा अत्यंत मौल्यवान धातू समजला जातो, सोन्याचे आकर्षण प्रत्येकालाच असते, विशेषतः स्त्रियांना सोन्याचे दागिने दागिन्यांची मोठी हौस तथा आवड असते. मात्र सोने घेण्यासाठी सराफा किंवा सोन्याच्या दुकानात जावे लागते. मात्र यापुढे एटीएम मधूनच सोने मिळाले तर! कसे शक्य आहे? असे कुणालाही वाटेल. परंतु तेलंगणातील हैद्राबाद येथे अशा प्रकारचे सोने देणारे देशातील पहिले एटीएम सुरू करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर देशात सुमारे ३ हजार ठिकाणी अशाप्रकारे ग्राहकांसाठी सोने देणारे एटीएम बसविण्यात येणार आहे.
यापूर्वी पाण्याचे एटीएम, धान्याचे एटीएम किंवा किराणा मालाची एटीएम आपणास परिचित होते. पैशाचे एटीएम तर जागोजागी असतात. आता सोने खरेदी करणे कॅशलेस पेमेंटच्या मदतीने एका मिनिटात सोने खरेदी करु शकता. म्हणजे सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला सराफा बाजारात जाण्याची, सोन्या-चांदीच्या दुकानात जाण्याची गरज नाही. गोल्ड एटीएममधून तुम्ही झटपट सोने खरेदी करु शकता. हैदराबाद येथे गोल्ड एटीएम सुरु करण्यात आले आहे.हे गोल्ड एटीएम गोल्डसिक्का प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सुरु केले आहे. हे देशातील पहिले रिअल टाईम गोल्ड डिस्पेन्सिंग मशीन असल्याचा कंपनीचा दावा आहे.
विशेष म्हणजे डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सोने खरेदी करता येईल. यामाध्यमातून रोख रक्कमेचा वापर न करता ग्राहकांना सोने खरेदी करता येईल. तात्काळ सोने खरेदीसाठी नागरिकांना या एटीएमचा वापर करता येणार आहे. काही बटणांचा वापर केल्यानंतर सोने खरेदी पूर्ण होईल. या एटीएममध्ये सध्याचा जो भाव आहे. त्याआधारे सोने खरेदी करता येईल. या एटीएम मशीनच्या स्क्रीनवर बाजार भाव दिसून येईल. सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या गोल्डसिक्काचे सीईओ सी. तरुज यांच्या मते, लोक या एटीएमचा वापर करून ०.५ ग्रॅम ते १०० ग्रॅमपर्यंतची सोन्याची नाणी खरेदी करू शकतात. या एटीएमवरील सोन्याची किंमत थेट अपडेट केली जाईल. गोल्ड एटीएम सेवा २४ तास उपलब्ध असेल.विशेष म्हणजे, देशातील पहिले ग्रीन एटीएम गेल्या वर्षी हरियाणातील गुरुग्राममध्ये स्थापन करण्यात आले होते.
https://twitter.com/goldsikkaltd/status/1599667175882907648?s=20&t=_2duIvGV9jIB-L-qAEkDWw
Gold ATM Launch in India First Time