विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली/नाशिक
देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याचे स्पॉट प्राइस म्हणजे सोन्याचे रोजचे दर रोजचे घसरले आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतींमध्ये प्रति १० ग्रॅममध्ये ४६४ रुपयांची घट झाली. या घसरणीमुळे सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमला ४७,७०५ रुपयांवर आली आहे. विशेष म्हणजे मागील काही आठवड्यात सोन्याचे सोन्याच्या दराने ५० हजाराचा टप्पा पार केला होता. जागतिक किमतीत घसरण झाल्यामुळे सोन्याच्या देशांतर्गत किंमतीत ही मंदी आली आहे. मागील आठवड्यात सोन्याचे दर १० ग्रॅमला ४८,१६९ रुपये होते.
सोन्यासह चांदीची देशांतर्गत किंमतही घसरली आहे. चांदीच्या दरात ७२३ रुपयांनी घट झाली. या घसरणीमुळे चांदीचा दर प्रति किलो ७०,४२० रुपयांवर आला आहे. मागील सत्रात चांदीची किंमत ७१,१४३ रुपये प्रति किलो झाली होती.
नाशकात स्थानिक सराफा बाजारात आज मंगळवारी (२२ जून) रोजी मात्र सोन्याच्या दरात काहीशी वाढ होऊन १० ग्रॅम ला ४९,२५० रुपये तर चांदी एका किलोला ७२,३०० इतका भाव आहे, असे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, मजबूत डॉलरच्या तुलनेत सोने धातूची घसरण वाढली आहे. कारण व्यापारी आणि गुंतवणूकदार येत्या बुधवारी होणाऱ्या अमेरिकन एफओएमसी बैठकीच्या ताज्या निर्णयाची अपेक्षा करतात. तर दुसरीकडे, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटी रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले की, सोन्याच्या किंमती एका आठवड्यापेक्षा कमी पातळीवर गेली आहेत. या आठवड्यात होणारी यूएस फेड रिझर्व्ह पॉलिसी मीट आणि मजबूत डॉलर यामुळे ही घसरण झाली आहे.
सोन्याप्रमाणेच चांदीच्या जागतिक किंमतीतही घसरण दिसून आली. दरम्यान, नाशिक मधील सराफा बाजारात मात्र मंगळवारी सोन्याचे दर १० ग्रॅमला ४९,२५० रु. इतके तर चांदीचे दर एका किलोचे दर ७२, ३०० रू. इतके आहेत, असे आर.सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक अशोक जैन यांनी सांगितले.
सोन्या-चांदीच्या दरात अलीकडच्या काळात सातत्याने चढ-उतार होत आहे. परंतु काही वेळा हजार ते दोन हजार रुपयांचा यामध्ये फरक दिसून येतो. पन्नास हजाराच्या पुढे गेलेले सोन्याचे दर आता काही प्रमाणात कमी झाल्याने लग्नसराईसाठी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी संधी आहे, असे मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केले.