इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभा निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या पथकाने अहिल्यानगर – पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर २३ कोटी ७१ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पकडले आहे. हे दागिने पकडल्यानंतर ते आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात दागिने पकडल्यानंतर खळबळ निर्माण झाली आहे.
मुंबई येथील झवेरी बाजार येथून जीपमधून हे दागिने घेऊन बीव्हीसी लॅाजिस्टीक कंपनीचे कर्मचारी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या ठिकाणी चालले होते. सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने त्यांची चौकशी केल्यानंतर वेगवेगळी माहिती दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आता बिलांची खात्री केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणी बीव्हीसी लॅाजिस्टिक कंपनीचे कर्मचारी चालक शांतकुमार कट्टीवल्ली, भय्यासाहेब बनसोडे, दिंगबर काजळे, बीव्हीसी लॅाजिस्टिक कंपनीचे कर्मचारी चालक शांतकुमार कट्टीवल्ली, भय्यासाहेब बनसोडे, दिगंबर काजळे, बीव्हीसी लॅाजिस्टिक कंपनीचे असिस्टंच मॅनेजर गोरख भिंगरदिवे या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईत चांदीची चाळीस किलोची वीट, सोन्याची बिस्किटे असे एकुण ५३ किलो चांदी, हिरे, मोत्यांचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहे. तपासणीत १४ अधिकृत पावत्याही आढळून आल्या आहे. तर वाहनासोबत असलेल्या वाहतूक कंपनीच्या कर्मचा-यांकडे मौल्यवान वस्तूंची वाहतूक करण्याचा परवाना नव्हता सुपा पोलिसांनी गोल्ड हॅल्युअर आणि कंपनीच्या प्रतिनिधींसमोर १५ पानांचा पंचनामा केला आहे.