इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिंदी चित्रपटसृष्टीत कपूर घराण्याचे मोठे योगदान आहे. अभिनेता राज कपूर यांच्या ऐतिहासिक बंगल्याची नुकतीच व्रिकी करण्यात आली. हा बंगला गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने खरेदी केला आहे. मुंबईतील चेंबूरमध्ये देवनार फार्म रोडवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या बाजूला हा बंगला आहे. हा बंगला विकत घेण्याआधी मे २०१९ मध्ये गोदरेज प्रॉपर्टीजने राज कपूर यांचा आरके स्टुडिओ देखील खरेदी केला होता. या बंगल्याची किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे. एक एकरवर पसरलेल्या परिसरात हा बंगला आहे. मुंबईतील सर्वात महागड्या परिसरांपैकी हा एक परिसर आहे. कपूर कुटुंबीयांनी या व्यवहाराच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
बॉलीवूडचा ‘शो मॅन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते आणि निर्माता राज कपूर यांनी अनेक वर्षे बॉलीवूडवर अधिराज्य गाजवले. त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरले होते. राज कपूर यांच्या अनेक आठवणी आहेत. राज कपूर यांचे फक्त चित्रपटच नाही तर संपत्तीचीही वेळोवेळी चर्चा झाली आहे. त्यांचे मोठमोठे बंगले आणि आलिशान गाड्यांविषयी चाहत्यांच्या मनात नेहमीच कुतूहल होतं. आता मात्र, त्यांच्या आठवणी हळूहळू पुसत होऊ लागल्या आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचा आरके स्टुडिओ विकला गेला. याच स्टुडिओत अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले. तोच स्टुडिओ काही काळापूर्वी विकला गेला आहे. आरके स्टुडिओनंतर आता त्यांचा चेंबूरचा कोट्यवधींचा बंगलाही विकला गेला आहे. राज कपूर यांचा चेंबूर येथील बंगला गोदरेज ग्रुपने विकत घेतला आहे. आता या बंगल्याच्या जागी आलिशान निवासी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याची उलाढाल ५०० कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज यांनी व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, राज कपूर यांचा हा बंगला सुमारे एक एकरमध्ये पसरला आहे. मुंबईतील देवनार फार्म रोडवर टाटा सामाजिक विज्ञान संस्थेजवळ हा बंगला आहे. हे क्षेत्र सर्वात प्रीमियम निवासी क्षेत्रांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. या कारणामुळे, आता येथे एक प्रीमियम निवासी प्रकल्प विकसित केला जाणार आहे.
श्री ४२० ते ‘बॉबी’ सारखे अनेक संस्मरणीय बॉलीवूड चित्रपट या बंगल्यात शूट करण्यात आले आहेत. त्याची किंमत ५०० कोटींहून अधिक असल्याचे समजते. या एवढ्या मोठ्या बंगल्याची देखभाल करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याने कपूर कुटुंबाने २०१८ मध्ये ही जमीन गोदरेज प्रॉपर्टीजला विकली. आरके कॉटेज हे आरके स्टुडिओच्या मागे आहे. राज कपूर, त्यांची पत्नी कृष्णा राज कपूर आणि त्यांची मुले १९४६ पासून सुमारे तीन हजार स्क्वेअर फुटांच्या या कॉटेजमध्ये राहत होते.
ऋषी कपूर आणि नीतू पासून करिश्मा कपूर आणि संजयपर्यंत अनेक लग्न आणि रिसेप्शन पार्टी या कॉटेजमध्ये झाल्या. मात्र, राज कपूर यांच्या पत्नी आणि मुलीच्या इच्छेविरुद्ध १३ वर्षांपूर्वी ही मालमत्ता विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळी त्याची अंदाजे किंमत ३० कोटी रुपये होती. बांधकाम व्यावसायिकांना त्याचे निवासी संकुलात रूपांतर करायचे होते. राज कपूर यांचा मुलगा रणधीर कपूर म्हणाले की, ‘चेंबूरमधील या प्रॉपर्टीसोबत आमचे भावनिक आणि ऐतिहासिक नाते आहे. आम्ही पुन्हा गोदरेज प्रॉपर्टीजसोबत जोडलो गेले आहोत, याचा आनंद आहे.’
After RK Studio in 2019, Godrej acquires Raj Kapoor’s bungalow too. pic.twitter.com/qiLGWx2qNs
— Film History Pics (@FilmHistoryPic) February 18, 2023
Godrej Group Buy Raj Kapoor Bungalow Price