इंडिया दर्पण विशेष लेखमाला
गोदाकाठचे वैभव – भाग २
…अन् गोदापात्रातून सुरू झाला जिवंत झरा
दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी नदीचा प्रवास नाशिक सहरातून जातो. रामकुंड परिसर हा अतिशय पवित्र समजला जातो. याच परिसरामध्ये अत्यंत देखणे आणि प्राचीन वैभव आहे. पण, त्याकडे आजवर सोयिस्कर दुर्लक्ष झाले आहे. आज आपण एक चमत्कार नाही तर वास्तवाविषयी जाणून घेणार आहोत.
भूगर्भातील जलशास्त्राची एकंदरीत वैज्ञानिक परिभाषा बदलणारा विस्मयकारी चमत्कार रामकुंड जवळ श्री गोदावरी नदी पात्रात घडला… ही घटना तशी विस्मयकारीच आहे. कारण, या घटनेमुळे अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले गेले आहे. त्यामुळे त्याविषयी आपण जाणून घेणे, त्यातून योग्य तो धडा घेणे आणि यापुढे नदीपात्र किंवा गोदावरीशी कुठलीही छेडछाड न करण्याचा चंग बांधणे आवश्यत आहे.
सन २००२ च्या सिंहस्थ – कुंभमेळा पूर्व श्री गोदावरी नदी पात्रात नाशिक महानगरपालिकेने तळ सिमेंट काँक्रिट केलेले होते. त्यामुळे स्वावलंबी गोदावरी नदी गंगापूर धरणाच्या पाण्यावर परावलंबी होऊन गेली. नदी पात्रातील जिवंत जलस्त्रोत बुजले गेले पात्रातील १७ पुरातन कुंड काँक्रिटखाली गाडले गेले. १७ पुरातन कुंड पैकी ५ कुंडांचे ४.५ लाख किलो सिमेंट काँक्रिट आपल्या याचिकेतील न्यायालयीन आदेशानुसार स्मार्ट सिटी कंपनीने काढले.
गोदा पात्रातील जिवंत जलस्त्रोत तपासण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या रामकुंड जवळील स्पॉटवर ट्रायल बोअर घेण्यात आला. त्यात ८० फुटला १.५ इंच पाणी लागले अर्थात ट्रायल बोअरमधून एका मिनिटाला ४१.३६ लिटर पाणी नॉन-स्टॉप २४ तास येते. मुबलक प्रमाणात पाणी लागले असून २४ तास जलपरी मोटर चालवून सुद्धा बोअर मधील पाणी आटत नाही व संपत नाही.
यावरून सिद्ध होते की, नदी पात्रातील जिवंत जलस्रोत आज रोजी सुस्थितीत आहे त्यामुळे क्षणच्या विलंब न लावता रामकुंडाचे तळ सिमेंट काँक्रिट काढले पाहिजे. रामकुंड जवळ ट्रायल बोअर मधून १ मिनिटमध्ये ४१ लिटर पाणी २४ तास तेही नॉनस्टॉप…. हे आश्चर्य नाही तर हे वास्तव आहे. आता तरी आपण जागे होणार आहोत का? केवळ नाशिकच नाही तर त्र्यंबकेश्वर येथेही गोदावरीला काँक्रिटमध्ये बंदिस्त केले आहे. तेथीलही गोदावरीचा श्वास मोकळा होणार का?
ट्रायल बोअर मधून येणाऱ्या २४ तास नॉनस्टॉप पाण्याचा रिपोर्ट असा
श्री. देवांग जानी
अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती
मो. 9850222100
Godavari River Ramkund Area Shocking Incidence by Devang Jani