दक्षिण गंगा अशी ओळख असलेल्या गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत असतो. मात्र, यासंदर्भात चर्चा होते आणि पुढे काही होत नाहीत. त्यातच हा प्रश्न यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे गेला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने नाशिक विभागीय महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीही गठीत केली आहे. हे सर्व होऊनही गोदावरीचे प्रदूषण कायम आहे. आता यासंदर्भात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. गोदावरीच्या प्रदूषणाबाबत काहीही तक्रार असली तर नाशिककर किंवा कुणीही नागरिक विभागीय महसूल आयुक्तांकडे तक्रार करु शकतो. आयुक्तांकडे divcomnashik@gmail.com या ईलेमवर, निवेदनाद्वारे, लँडलाईन फोनद्वारे किंवा मोबाईलवर तक्रार करु शकता. विशेष म्हणजे, या तक्रारीचे ३ आठवड्याच्या आत निराकरण करणे उच्च न्यायालयाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्वरीत तक्रार करा आणि गोदावरीला प्रदूषण मुक्त करा, असे आवाहन याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी बघा हा व्हिडिओ आणि न्यायालयाचा आदेश
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!