नाशिक – दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी नदीचे राष्ट्रीय गान तयार झाले असून ते सर्वांसाठी नुकतेच समर्पित करण्यात आले आहे. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हे गीत तयार करण्यात आले आहे. हे गीत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायले आहे. निर्माते राजेश पंडित आहेत. अभिनेते चिन्मय उदगीरकर, किरण भालेराव यांनीही गीतात सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे अभिनेते अजय देवगन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनीही गीताच्या सुरुवातीला आणि शेवटी आवाहन केले आहे. हे गीत आता गोदावरी ज्या भागातून वाहते तेथील शाळांमध्ये गायले जाणार असल्याचे डॉ. सिंग यांनी सांगितले आहे.
बघा हे गोदावरी गीत