नाशिक – पावसाचा जोर असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. सद्यस्थितीत रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे. परिणामी, रामकुंडावरील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. धरण क्षेत्रातील पाऊस लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बघा रामकुंड परिसरातील पूरस्थितीचा व्हिडिओ
https://m.facebook.com/IndiaDarpanLive/videos/d41d8cd9/896124671288681/?refsrc=deprecated&_rdr
https://m.facebook.com/IndiaDarpanLive/videos/d41d8cd9/896124671288681/?refsrc=deprecated&_rdr