नाशिक – गोदावरी अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती बँकेचे मा. अध्यक्ष व नवनिर्वाचित सदस्य आर्किटेक्ट अमृता वसंतराव पवार यांनी दिली. या निव़डणुकीत २०२२ ते २०२७ या काळासाठी संचालक मंडळाची निवड करण्यात आल्याचे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांनी दिले. या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून इंजि. प्रणव वसंतराव पवार, सीए राजाराम बस्ते, वसंत खैरनार, सुरेश पाटील, अॅड. दत्तात्रय पिंगळे, रविंद्र मणियार, मनोहर दगाजी देवरे, अमोल महाले, अनिल भालेराव, विवेक तांबे. अनुसूचित जाती – जमाती गटातून डॉ. तानाजी कानडे इतर मागासवर्ग गटातून योगेश (मुन्ना) हिरे, भ. वि. जाती – जमाती गटातून दौलतराव बोडके, महिला प्रतिनिधी गटातून आर्किटेक्ट अमृता वसंतराव पवार, अनिता महेश भामरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.