शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गोदावरी कालव्यातून तीन आवर्तने सोडण्यात येतील…जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

by India Darpan
जानेवारी 7, 2025 | 12:46 am
in संमिश्र वार्ता
0
WhatsApp Image 2025 01 06 at 72725 PM 1024x851 1

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोदावरी खोऱ्यात डावा व उजवा कालवा खोऱ्यात तीन आवर्तने सोडण्यात येतील. अतिरिक्त पाणी बचत झाल्यास चौथे आवर्तन सोडण्याचा विचार करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

राहाता येथे झालेल्या गोदावरी डावा व उजवा कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत अध्यक्षपदावरून ते बोलत होते. याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोष काळे, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, समितीचे सदस्य तसेच शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, नाशिक विभाग मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की,‌ शेतकऱ्यांनी पाण्याची बचत करून अधिकचे पाणी शेतील ‌कसे उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावेत, गोदावरी उजव्या कालवा नूतनीकरणासाठी १९१ कोटींची मान्यता शासनाने दिली आहे. डावा व उजवा कालव्याच्या चारी दुरूस्ती करिता २६० कोटींचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्यास मान्यता देण्यात येईल. साधारणतः ४५० कोटी फक्त गोदावरी खोऱ्यावर शासन खर्च करणार आहे. पश्चिम वाहिनीनदीचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या सर्वेक्षणासाठी ६५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. गोदावरी खोऱ्यात नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी वळविणे हे जलसंपदा विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सर्वांना समप्रमाणात पाणी मिळावी ही शासनाची भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, शिर्डी नगरपालिकेच्या वाया जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी चारी क्र.११, १२ व १३ मध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना बारामाही पाणी मिळणार आहे. पिंपळवाडी चारी क्र. १४ स्वतंत्र पाइपलाइन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांना असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोष काळे, विवेक कोल्हे यांचीही भाषणे झाली. गोदावरी कालव्यातील रब्वी- खरीप हंगाम २०२४-२५ च्या आवर्तन नियोजनाबाबत श्री.गोवर्धने यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. रब्बी १ व उन्हाळ्यात २ आवर्तन देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नांदणी येथील जैन मठास तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा मिळणार….

Next Post

लोकायुक्त कार्यालयाकडे ४ हजार ७९० नवीन तक्रारीची नोंद…राज्यपालांना अहवाल सादर

Next Post
State Lokayukt presents report to Governor 1 1024x683 1

लोकायुक्त कार्यालयाकडे ४ हजार ७९० नवीन तक्रारीची नोंद…राज्यपालांना अहवाल सादर

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
Screenshot 20250621 062146 Collage Maker GridArt

नाशिक जिल्हा परिषदेचा नवीन कार्यालयात जाण्याचा मुहूर्त अखेर ठरला…जुन्या इमारतीत होणार हे कार्यालय

जून 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011