नाशिक – गोदावरी नदीमध्ये दोन जण मोटारसायकलसह पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रात्री घडली. अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. दोघेही जळगावचे असून ते मित्र होते. कामानिमित्त ते नाशिकला आल्यानंतर ते पंचवटी मध्ये थांबले होते. ही घटना रात्री झाल्यामुळे या दोघांना मदत मिळू शकले नाही. दरम्यान पंचवटी पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी तपास करत आहे. दोन्ही युवकांची प्रेत पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत. पंचवटी कॉलेज समोर हा अपघात झाला आहे. दोघी युवकांची ओळख पटलेली नाही अधिक तपास पोलीस करत आहेत.