बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महिलांसाठी शेळीपालन योजना; राज्यातील पहिल्या प्रायोगिक प्रकल्पाचा शुभारंभ

by India Darpan
मे 23, 2022 | 5:22 pm
in राज्य
0
x570 1

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराच्या संधीसोबतच आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी शेळीपालनातून महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत गोट बँकेच्या सहकार्याने पाचशे महिलांना शेळीचे वाटप करण्यात येत असून या योजनेच्या यशस्वीतेनंतर ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल. महिलांनी शेळी पालनाचा व्यवसाय करुन आर्थिक विकास साधावा, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.

रामटेक तालुक्यातील अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या बोंद्री येथील प्रक्षेत्रावर गोट बँकेच्या सहकार्याने पाचशे महिलांना शेळ्यांचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. केदार बोलत होते. गोट बँकेच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारा महिलांना शेळी ‍वितरणाचा राज्यातील हा पहिला उपक्रम आहे. यावेळी पहिल्या शंभर महिलांना शेळीचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे, उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती चाफेश्वर वैद्य, महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला बोंडारे, महाराष्ट्र मत्स्य व पशुसंर्धन विद्यापीठाचे कुलगुरु आशिष पातुरकर, गोट बँक ऑफ कारखेड्याचे अध्यक्ष नरेश देशमुख, व्यंकटेश्वरा गोट बँकेचे प्रमुख सतीश भांडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक पांडे, जिल्हा परिषद सदस्य दुधारामजी सव्वालाखे, माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, उपविभागीय अधिकारी श्रीमती वंदना सरंगपते, सरपंच श्रीमती सुषमा भिमनवार, पंचायत समिती सभापती, लोकप्रतिनिधी, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

पशुपालन विशेषत: शेळी व मेंढी पालन करणाऱ्या एकाही शेतकऱ्याने विपरित परिस्थितीत आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता संपूर्ण कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिले असल्याचे सांगताना पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार म्हणाले की, पशुधन हे लक्ष्मीधन म्हणून महिलांना गोट बँकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. महिलांनीही शेळीपालनाला प्राधान्य देऊन या व्यवसायाला यशस्वी करावे. अमूलच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाची मोठी चळवळ डॉ. कुरियन यांनी राबविली असून त्याच धर्तीवर राज्यात गोट बँकेच्या माध्यमातून शेळी व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

शेळीपालनामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार जास्त उत्पादन व लाभ देणाऱ्या प्रजाती विकसित करण्यात येत आहेत. पन्नास किलोपर्यंत वजन असलेल्या शेळीचे संगोपन करताना त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. शेळी वितरित करताना सोनोग्राफीसह तपासणी करण्यात येईल. तसेच घरपोच वैद्यकीय सुविधा देण्यात आली आहे. शेळीपासून दूध व मांस याला बाजारपेठेत मागणी वाढत असल्यामुळे निर्यातीलाही प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे सुनील केदार यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे म्हणाल्या की, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना शेळीचे वाटप करण्यात येत आहे. गोट बँकेमार्फत शेळी वितरित केल्यानंतर 36 महिन्यांनी त्याची चार पिल्ले बँकेला परत करायची आहेत. शेळीपालन हा महिलांसाठी रोजगाराचा व्यवसाय ठरत असल्यामुळे महिलांनीही बचत गट स्थापन करावा व शेळीच्या संगोपनासाठी जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले.

गोट बँक ऑफ कारखेडाचे अध्यक्ष नरेश देशमुख यांनी बँकेच्या व्यवहाराप्रमाणे शेळीपालन करायचे आहे. यामध्ये बकरा चलन म्हणून वापरल्या जाणार असून महिला सदस्याने अर्ज केल्यानंतर त्यांना तात्काळ शेळीचे वितरण केले जाणार आहे. उमेद तसेच इतर बचत गटाच्या माध्यमातून शेळी वाटप तसेच त्यांची तपासणी व वसुली आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य दुधारामजी सव्वालाखे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातुरकर, व्यंकटेश्वरा गोट बँकेचे प्रमुख डॉ. सतीश भांडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी शेळी विकास मंडळाचे व्यवस्थापकीय डॉ. शंशांक कांबळे यांनी मेंढीपासून तयार करण्यात आलेली घोंगडी व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. प्रास्तविकात गोट बँक ऑफ कारखेडा यांच्या सहकार्याने पाचशे महिलांना शेळी वितरित करण्यात येत असल्याचे सांगताना महांमडळामार्फत राज्यात प्रक्षेत्रात विविध रोजगाराभिमुख उपक्रम सुरु करण्यात आले आहे. शेळ्यांमध्ये कृत्रिम रेतनाचा वापर उत्पादकता वाढविणे, शेळी मित्र ॲपचा वापर तसेच धनगर व मेंढपाळ यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे शेळीपालन व्यवसाय यावर डॉ. सारीपुत लांडगे, डॉ. जीवनकुमार चहांदे, डॉ. महेश जावळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रेस्टॉरंट व्यवस्थापनाचे सॉफ्टवेअर ‘पेटपूजा’ आता मराठीतही

Next Post

जपानमधील भारतीय समुदायासमोर मोदींचे अत्यंत भावनिक भाषण (व्हिडिओ)

Next Post
FTcG4CJUcAAJ54Q

जपानमधील भारतीय समुदायासमोर मोदींचे अत्यंत भावनिक भाषण (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011