नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गो-फर्स्ट एअरलाइन्सच्या अडचणी अद्यापही संपताना दिसत नाही. इंजिन सप्लायर प्रॅट अँड व्हिटनीने इंजिनची डिलिव्हरी न केल्यामुळे एअरलाइनने ९ मे पर्यंत आपली उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी कंपनीने केवळ तीन दिवस उड्डाणे बंद केली होती. मात्र, न सुटलेल्या आर्थिक संकटामुळे GoFirstच्या अडचणी वाढल्या आहेत.
यासह GoFirst ने १५ मे पर्यंत तिकिटांच्या विक्रीवर बंदी घातली आहे आणि सध्याच्या बुकिंगच्या तारखा आणखी बदलण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे. हवाई वाहतूक प्राधिकरणाने (डीजीसीए) यापूर्वी ३ मे ते ५ मे पर्यंतची उड्डाणे रद्द करण्यासाठी एअरलाइनला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला उत्तर मिळाल्यानंतर, डीजीसीएने सांगितले की, GoFirst ने अचानकपणे ऑपरेशन्स स्थगित केल्यामुळे प्रवाशांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी ते वचनबद्ध आहे.
दिवाळखोरीच्या कारवाईअंतर्गत संकटातून बाहेर काढण्याची मागणी कंपनीने सरकारला देखील केली आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना तिकिटांचे पैसे परत करावेत, असा प्रश्न उपस्थित केला आहे. आता विमान वाहतूक नियामक DGCA ने याबाबत आदेश जारी केला आहे. डीजीसीएने म्हटले आहे की GoFirst ने प्रवाशांना पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू करावी.
https://twitter.com/GoFirstairways/status/1654021451798724608?s=20
Go First Airline Ticket Booking DGCA Order