गो एअरची हवा का गेली?
भारतात देशांतर्गत सेवा पुरविणाऱ्या महत्त्वाच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या गो एअर या कंपनीने अचानक २ दिवसांची सेवा स्थगित केली आहे. तसेच, कंपनीने दिवाळखोरीबाबत अर्जही केला आहे. हे सारे अचानक घडले का, एवढ्या मोठ्या प्रमाणात बुकींग होत असूनही हे दिवस का आले, प्रवाशांचे काय, या सर्व परिस्थितीवर सरकारचे काहीच नियंत्रण नाही का या सर्वाची उत्तरे मिळायलाच हवीत.
कोरोनानंतर सर्व व्यवस्थित सुरू झाल्यानंतर पर्यटन प्रचंड प्रमाणात वाढले आहे. विमान तिकीटांचे दर भरपुर वाढले असले तरी मोठ्या प्रमाणावर लोक विमानाने प्रवास करत आहेत. आता तर उन्हाळी सुट्यांमुळे पर्यटनात वाढ झाल्याने जवळपास सर्व कंपन्यांची सर्व विमाने १००% फुल होत आहे. मी आताच गो फर्स्ट च्या विमानाने बॅक टू बॅक काही सहली केल्या. सर्व फ्लाईट जवळपास फुल असायच्या हे मी स्वता बघितले आहे. मग हा पैसा गेला कुठे?
अशी एखादी कंपनी कुठल्याही प्रकारच्या सुचना न देता अचानक एक दिवस अगोदर विमान उड्डाणे कशी थांबवू शकते. मग सरकारचे यांचेवर काहीच नियंत्रण नाही का? एवढी मोठी कंपनी अशी अचानक दिवाळखोरीत जाते का ?गो ऐयरचे गो फर्स्ट झाले तेंव्हाच सरकारने यात दखल का दिली नाही. एखाद्या प्रवाशाची बॅग चूकून दुसरीकडे गेली तर लगेच ट्वीट करून संबधिताची बॅग घरी नेऊन द्या असे आदेश देणारे तरुण तडफदार हवाई मंत्री व शासनाला गो फर्स्टला इतक्या गंभीर आजाराने ग्रासले हे कळले नसेल का? आणि अशा अचानक फ्लाईटस बंद केल्याने लाखो पर्यटकांचे नियोजन ढासळले, पुढील बुकींग वाया गेले याला जबाबदार कोण. हाॅटेल्स व्यवस्थित सुरु असल्याने ते पैसे परत मिळणार नाहीत. वाहनांचे पैसे परत मिळणार नाही मग फक्त विमान तिकीटाचा परतावा घेऊन काय उपयोग. आणि तो तरी कधी मिळणार व मिळणार की नाही मिळणार?
गो फर्स्ट ही देशातील प्रमुख विमान कंपन्यांपैकी एक आहे या कंपनीने ऐन हंगामात असा खेळ करून ठेवल्याने पर्यटन व्यावसायिकांची झोप उडाली आहे. सिझनमधे नवनवीन सहलींचे नियोजन करणे , वेळेवर येणारी बुकींग्ज कॅश करणे हे सोडून आता पॅनिक न होता प्रवास रद्द झालेल्या प्रवाशांना उत्तरे देणे व त्यांचे रीफंड मिळवणे हे काम मागे लागले आहे. आमचेसाठी हा दोन पैसे कमवण्याचा काळ असतो तो महत्वाचा काळ आता अशी रिकामी कामे करण्यात जाणार आहे. याला जबाबदार कोण?
प्रचंड प्रमाणात पैसा मिळत असतांना ही हे असे का करतात? अशी ऐक ना अनेक प्रश्नांची मालिका उभी करून , हजारो कामगारांचे भवितव्य टांगणीवा लावून व लाखो पर्यटकांचा हिरमोड करुन असे बेताल वागणार्या कंपन्याना व त्यांच्या मालकांना शासनाने योग्य तो धडा दिला पाहीजे अन्यथा कुणी केंव्हाही हात वर करुन मोकळा होईल व याचे परीणाम सामान्यांना भोगावे लागतील. सरकारला काय फरक पडतो एक कंपनी गेली की दूसरी येईल ती शासनाला भरभरुन तिजोरीत गरिबांचे दान देईल. पण लक्षात ठेवा हा गरीबांचा तळतळाटच एक दिवस अशा धन दांडग्यांना व हवेत उडणार्या सरकारला ताळ्यावर आणेल.
Go Air Service Cancelled Booking Passengers by Datta Bhalerao