शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अरररर…!! प्रवाशांना न घेताच विमान उडाले भूर्रर्र… आता अशी करणार भरपाई…

by India Darpan
जानेवारी 12, 2023 | 5:09 am
in राष्ट्रीय
0
FmKEkz0agAIYTrJ e1673453452818

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क  – मागच्या सीटवरची व्यक्ति बसण्यापूर्वीच दुचाकी पुढे निघून गेल्याच्या घटना आपल्या आयुष्यात दररोज घडतात. त्या गमतीदार असतात. पण एखादे विमान प्रवासी बसण्यापूर्वीच उडून गेल्याची घटना घडू शकते, असा तुम्ही स्वप्नात तरी विचार करू शकता का? याचे उत्तर नाही असेल, पण असे प्रत्यक्ष करून दाखविण्याची किमय केली आहे गो एअर कंपनीच्या विमानाने. ये इंडिया है भाई… यहाँ कुछ भी हो सकता है।

वेळ आणि शिस्त पाळणं हे कुठल्याही विमान कंपनीचं पहिलं कर्तव्य मानलं जातं. म्हणजे तुम्ही पाच मिनिटे उशिरा आलात म्हणून गावातली बस थांबू शकते, विमान तुमच्यासाठी थांबत नाही. अश्यावेळी बंगळुरू येथून दिल्लीसाठी जाणारे प्रवासी आपलं विमान उडताना डोळ्याने बघत राहिले आणि ते काहीच करू शकले नाही. बंगळुरू येथून दिल्लीला जाण्यासाठी जवळपास ५५ प्रवाश्यांनी बोर्डींग पास घेतले आणि चेक-इन करून प्रवासासाठी सज्ज झाले. इतर प्रक्रिया झाल्यानंतर सगळे प्रवासी बसने विमानाच्या जवळ पोहोचले. पण सगळे प्रवासी बसमध्येच असताना गो एअरचे हे G8-116 हे विमान आकाशाच्या दिशेने झेपावले. पहिले तर प्रवाश्यांना वाटलं की हे विमान आपलं नाहीच. पण जेव्हा विमानतळावरील इतर कर्मचाऱ्यांचा गोंधळ झाला, तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपल्या डोळ्यापुढे जे विमान भूर्र उडालं ते आपलंच होतं. नागरी विमान वाहतुक महासंचालनालयानं या घटनेची गंभीर दखल घेत गो-एअरला खडसून सुनावले आहे.

एक प्रवास फ्री
गो-एअरने संबंधित विमानातील सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने काढून टाकले आहे. पण त्यामुळे प्रवाश्यांचं समाधान थोडेच होणार होतं. त्यामुळे कंपनीने सर्व प्रवाश्यांना वर्षभरात भारतात कुठल्याही शहरात जाण्यासाठी एका मोफत विमान प्रवासाची घोषणा केली आहे.
एअर इंडिया आले धावून
गो-एअरने अफलातून पराक्रम केल्यानंतर या प्रवाश्यांना एअर इंडियाचा पर्याय देण्यात आला. सकाळी साडेसहावाजता दिल्लीच्या दिशेने निघालेले प्रवासी सकाळी १० वाजता म्हणजे जवळपास चार तासांनी एअर इंडियाच्या विमानात बसले आणि पुढे निघाले.

Go Air Flight 50 passengers Take Off Compensation Aviation
Air Service Bengaluru

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उर्फी जावेदने घेतली जावेद अख्तर यांची भेट; म्हणाली…

Next Post

FCI घोटाळ्यात पैसाच पैसा… सोने, चांदी, रोकड… CBIचे अधिकारीही चक्रावले

Next Post
Capture 8

FCI घोटाळ्यात पैसाच पैसा... सोने, चांदी, रोकड... CBIचे अधिकारीही चक्रावले

ताज्या बातम्या

GqfRvQmXwAE eHd e1746774742475

आयपीलचे उर्वरीत सर्व सामने स्थगित…बीसीसीआयने घेतला निर्णय

मे 9, 2025
jail11

अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चैनस्नॅचिंग करणारा चोर गजाआड…१० गुन्ह्याची कबुली, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

मे 9, 2025
LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025
INDIA GOVERMENT

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

मे 9, 2025
8 2

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट…हे आहे कारण

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा आर्थिक व्यवहार डगमगण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार, ९ मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011