विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
बाहेरगावच्या माणसाला संदेश देण्यासाठी पुर्वीच्या काळातील पोस्ट कार्ड म्हणजेच पत्र पाठवण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता ईमेल पर्यंत येऊन थांबला आहे. सहाजिकच आधुनिक आणि जलद जीवन शैलीच्या काळात गुगलच्या जीमेलला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र यामध्ये काही अडचणी आल्यास अनेकांना त्रास सहन करावा लागतो, अशा प्रकारे अडचणी येऊ नये म्हणून काय करावे ? हे जाणून घेऊ या…
सध्या जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ईमेल पाठवण्यासाठी गुगलची जीमेल सेवा वापरत आहे. काही वेळा असे होते की, वापरकर्त्यांना Gmail वर नवीन ईमेल प्राप्त करता येत नाहीत. यात काही तांत्रिक कारणांमुळे असे घडू शकते. परंतु ही अडचण निश्चित दूर केली जाऊ शकते. काही टिप्सच्या मदतीने, आपण नवीन ईमेल न मिळण्याची समस्या दूर करू शकतो.
Google स्टोरेज स्पेस साफ करा :
जुन्या ईमेलच्या मोठ्या संख्येमुळे, स्टोरेजची जागा भरली जाते. म्हणूनच आपण नवीन ईमेल प्राप्त करण्यास सक्षम नाही. त्यामुळे वेळोवेळी स्टोरेज स्पेस मधून जुने ईमेल डिलीट करा, त्यामुळे स्टोरेज मोकळे होईल आणि तुम्ही नवीन ईमेल प्राप्त करू शकाल. याशिवाय, आपण स्टोरेज प्लॅनही अपग्रेड करू शकता.
एकच ईमेल दुसऱ्या फोल्डरमध्ये नाही याची खात्री करा : Gmail स्वयंचलित यंत्रणा वापरून येणारे ईमेल स्वतंत्र फोल्डरमध्ये ठेवते. जीमेल जेव्हा ईमेलला स्पॅम म्हणून चिन्हांकित करेल आणि एका वेगळ्या फोल्डरमध्ये ठेवेल. तेव्हा एकदा Gmail चे स्पॅम फोल्डर तपासावे आणि जर तो मेल त्या फोल्डरमध्ये सापडला तर ते मेल निवडा आणि इनबॉक्समध्ये ट्रान्सफर करा.
इंटरनेट कनेक्शन तपासा : नवीन ईमेल प्राप्त करण्यासाठी जलद किंवा सक्रिय इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. बऱ्याच वेळा असे होते की नवीन ईमेल कमी इंटरनेट स्पीडमुळे येत नाहीत. अशा परिस्थितीत सर्वप्रथम इंटरनेट कनेक्शन तपासा.
IMAP बंद असल्यास नवीन ईमेल प्राप्त करण्यास अडचण : काही वेळा असे घडते की, IMAP बंद केल्यामुळे एखाद्या मेल वापरकर्त्यांना Gmail वर नवीन ईमेल प्राप्त करता येत नाहीत, त्यामुळे असे घडल्यास, सर्व प्रथम आपल्या वेब ब्राउझरवर जा आणि IMAP पर्याय तपासा. जर हा पर्याय बंद केला असेल, तर प्रथम तुमच्या gmail वर जा, आता गिअर चिन्हावर क्लिक करून सेटिंग्ज वर जा, येथे IMAP टॅब निवडा, आता तुम्हाला खाली स्क्रोल करून IMAP अॅक्सेसचा पर्याय दिसेल, तो सुरू करा म्हणजे मेल प्राप्त होईल.