सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पालकमंत्री भुजबळ यांनी घेतला येवला, निफाडचा कोरोना आढावा; दिले हे निर्देश

by India Darpan
जून 13, 2021 | 12:25 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210613 WA0009

नाशिक – कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरी देखील शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत कोरोना टेस्टिंग आणि तपासणी मोहीम सुरूच ठेवावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज येवला शासकीय विश्रामगृह येथे येवला, निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती उपाय योजना व विकास कामांची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, नपा गटनेते प्रवीण बनकर, येवल्याचे प्रांत अधिकारी सोपान कासार, निफाडच्या प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे,  मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपअभियंता उन्मेष पाटील, जनार्दन फुलारी, तालुका पोलीस निरिक्षक अनिल भवारी, येवला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे. मात्र अद्यापही आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना व कोरोना तपासणी नियमित सुरू ठेवावी. कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत उपाययोजना कायम सुरू ठेवाव्यात. तसेच रुग्ण संख्या कमी झाली म्हणून गाफील राहू नये अशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट ला तातडीने स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसविण्यात यावे असे आदेश दिले.
भविष्यात येवला शहरात लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असल्यास पाणी साठा वाढविण्याच्या दृष्टीने साठवण तलावाचे नियोजन करण्यात यावे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छता, गटार सफाई यासह आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्यात यावे अशा सूचना केल्या.
शेतकऱ्यांच्या पीककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात पीक कर्जाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना केल्या. तसेच वृक्ष लागवड मोहीम हाती घेऊन जास्तीत जास्त झाडे लावण्यात यावी असे आदेश दिले.
कामे लवकर पूर्ण करा
येवला दौऱ्यावर असतांना आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला शहर व तालुक्यात रखडलेल्या कामांची अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेतला. यावेळी येवला शहरातील शादिखाना, वाचनालय, पर्यटन विकास कामे, येवला शहर सुशोभीकरण, रस्ते यासह रखडलेली लोकउपयोगी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
शिवसृष्टीच्या जागेची पाहणी
येवला शहराच्या सौन्दर्यात भर पडणाऱ्या येवला शिवसृष्टी प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाची निविदा देखील काढण्यात आली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसृष्टी जागेची पाहणी करून याठिकाणी करावयाच्या कामांबाबत नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्र्यांनी साधला गिर्यारोहक, दुर्गप्रेमींशी संवाद, म्हणाले…

Next Post

नाशिक येथे आढळला दुर्मिळ रसेल कुकरी साप

India Darpan

Next Post
IMG 20210613 WA0004

नाशिक येथे आढळला दुर्मिळ रसेल कुकरी साप

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011