विशेष प्रतिनिधी, नाशिक
नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या सोमवारपासून (२१ जून) नाशिक व मालेगाव शहरातील मॉल्स सुरू होणार आहेत. त्यांनाही दुपारी ४ वाजेपर्यंतचचेच बंधन राहणार आहे. तसेच, मॉल्समधील सर्व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच, मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे तपमान मोजणे, मास्क हे सक्तीचे असणार आहे. मॉलमध्ये केवळ ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून आणखी निर्बंध शिथील केले जाणार नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. अन्य मागण्यांबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पालकमंत्र्यांची संपूर्ण पत्रकार परिषद बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=315626806705945&id=103446941470343
बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आदेश असे











