विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम असून, ते जगातील सर्वाधिक स्वीकार्ह नेते आहेत, असा निष्कर्ष मॉर्निंग कंसल्ट या अमेरिकेच्या डाटा इंटेलिजेंस कंपनीने काढला आहे. कंपनीकडून एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात स्वीकार्ह नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी जगातील इतर नेत्यांच्या तुलनेत सर्वात पुढे आहेत. पंतप्रधान मोदी यांचा ग्लोबल अप्रूव्हल रेटिंग ६६ टक्के इतका आहे. कोरोना काळातही ते अमेरिका, ब्रिटेन, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांच्या नेत्यांच्या तुलनेत त्यांचा दर चांगला आहे.
मॉर्निंग कंसल्टतर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान त्यांची लोकप्रियता अथवा अप्रूव्हल रेटिंगमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. तरीही ते जगभरात अग्रस्थानी कायम आहेत. जगातील इतर नेत्यांच्या तुलनेत त्यांचा दर चांगला आहे. या अप्रूव्हल रेटिंगमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यानंतर इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी यांचा क्रमांक लागतो. त्यांचा अप्रूव्हल रेटिंग ६५ टक्के आहे. मॅक्सिकोचे राष्ट्रपती लोपेज ओब्रेडोर ६३ टक्क्यांच्या दरावर तिसर्या स्थानावर आहेत.
नेत्यांची अप्रुव्हल रेटिंग
मॉर्निंंग कंसल्ट ही एजंसी नियमितरित्या जगातील सर्व नेत्यांचे अप्रूव्हल रेटिंग ट्रॅक करते. त्यांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी (६६ टक्के), इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी (६५ टक्के), मॅक्सिकन राष्ट्रपती एंड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रेडोर (६३ टक्के), ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (५४ टक्के), जर्मनीच्या चँन्सलर एंजेला मर्केल (५३ टक्के), अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन (३७ टक्के), कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (४८ टक्के), ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (४४ टक्के), दक्षिण कोरीयाचे राष्ट्रपती मून जे-इन (३७ टक्के), स्पेनेचे पेट्रो सांचेज (३६ टक्के), ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअर मॅक्रॉन (३५ टक्के) आणि जापानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा (२९ टक्के) अशी नेत्यांची रेटिंग आहे.
मॉर्निंग कंसल्टच्या जागतिक नेते अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकरने भारतात २,१२६ वयस्कांचे सँपल साइझ जमा केले. त्यामध्ये पंतप्रधान ६६ टक्के अप्रूव्हल दाखविले. तर २८ टक्के नागरिकांनी त्यांना अस्वीकारार्ह नेत्यांच्या यादीत टाकले. प्रत्येक देशांचे वेगवेगळे सँपल साइझ आहेत.