पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अत्याधुनिक मोबाईल तथा स्मार्टफोन ही प्रत्येकाचीच आजच्या काळात गरज बनली आहे. किंबहुना फोन शिवाय कोणताही व्यक्ती जगू शकत नाही! असे म्हटले तरी चालेल. कारण आबालवृद्धांच्या हातात आजच्या काळात आपल्याला फोन दिसून येतो. त्यातच स्वतःकडे सध्या 1 ते 2 स्मार्टफोन असताना नवनवीन तंत्रज्ञान असलेले फोन घेण्यासाठी ग्राहकांचा कल वाढलेला दिसतो. त्यामुळे जुने फोनचे काय करायचे हादेखील प्रश्न निर्माण होतो. नवीन फोन घेताना या गोष्टीचा फारसा विचार होत नाही. परंतु आता एका कंपनीने जुने फोन देऊन ग्राहकांसाठी नवीन फोन घेण्याची ऑफर दिली आहे, तो ही कोणत्याही किमती शिवाय म्हणजे अगदी मोफत! या आगळ्यावेगळ्या योजनेला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे, आता काय आहे नेमकी ही योजना जाणून घेऊ या..
प्रसिद्ध भारतीय Lava कंपनीने स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक्सचेंज ऑफर जाहीर केली आहे. या बाबत Lavaकंपनीने सांगितले आहे की, Realme 8s चे यूजर्स त्यांच्या जुन्या फोन ऐवजी नवीन Lava Agni घेऊ शकतात. Realme 8s च्या 6GB आणि 8GB दोन्ही प्रकारांचे वापरकर्ते या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
विशेष म्हणजे हे दोन्ही स्मार्टफोन Mediatek Dimensity 810 chipset द्वारे देण्यात येत आहेत, Lava Agni 5G मध्ये 6.78-इंच स्क्रीन आणि 64MP + 5MP + 2MP + 2MP कॅमेरे क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये आहेत, तर Realme 8s जे 6.5-इंच स्क्रीनसह येते आणि त्यात एक 64MP + 2MP + 2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.
विशेष म्हणजे भारतातील सर्व ग्राहकांसाठी ही ऑफर देशभरात दि. 7 जानेवारी 2022 पर्यंत उपलब्ध आहे. Realme 8s वापरकर्ते ग्राहक लावाच्या ई-स्टोअरवर ऑनलाइन फॉर्म भरू शकतात आणि त्या बदल्यात नवीन Lava Agni 5G फोन मिळवू शकतात.
Lava Agni 5G मध्ये Mediatek च्या Dimensity 810, 90Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंच FHD+ IPS पंच होल डिस्प्ले आणि 8GB RAM + 128GB ROM आणि लिक्विड कूलिंग तंत्रज्ञान आहे.
या स्मार्टफोनमध्ये 64MP प्राथमिक कॅमेरा, 5MP वाइड अँगल कॅमेरा, 2MP डेप्थ कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. स्मार्टफोन आपल्या सर्व सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा देखील पॅक करतो. तसेचAGNI 5,000mAh बॅटरी पॅक करते आणि 30W फास्ट चार्जरसह देण्यात येते.