नवी दिल्ली – देशभरातील मुलींसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी (एनडीए) पाठोपाठ आता दोन राष्ट्रीय नामांकीत संस्थांमध्येही मुलींना प्रवेश मिळणार आहे. तशी ग्वाही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला मुलींचा लढा आता थांबणार आहे.
राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय (आरआयएमसी) आणि देशातील पाच राष्ट्रीय सैन्य शाळा (आरएमएस) मध्ये देखील मुलींना प्रवेश मिळू शकणार आहे. कारण एनडीएप्रमाणेच सशस्त्र दलांसाठी फीडर संस्था म्हणून काम करतात. तसेच आरआयएमसी आणि आरएमएस या संस्थांमध्ये आतापर्यंत फक्त मुलांनाच प्रवेश दिला जातो. परंतु आता या निर्णयात बदल करण्यास आला आहे, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे.
या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करताना केंद्राने आवश्यक संरचनात्मक बदल केल्यानंतर 2022 ते 2023 शैक्षणिक सत्रापासून RIMC आणि RMS मध्ये मुलींचा समावेश करण्याचा निर्णय कळवला. डेहराडूनमधील RIMC मध्ये 11 ते 13 वयोगटातील मुले अखिल भारतीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संस्थेत सामील होतात. परंतु जानेवारी 2023 पासून दर सहा महिन्यांनी 5 मुलींना प्रवेश देण्यास सुरुवात करेल, त्यासाठी मुलींना जून 2022 मध्ये प्रवेश परीक्षा देण्याची परवानगी असेल.
या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे वर्णन करताना केंद्र सरकारने सांगितले की, दरवर्षी त्यात 20 टक्के वाढ केली जाईल. यामुळे काही पायाभूत सुविधांतही सुधारणा होईल. तर दुसऱ्या टप्प्यात RIMC ची क्षमता वाढवून एकूण 350 केली जाईल, त्यात 100 मुलींचा समावेश असेल. मुलींना जून 2028 पासून आरआयएमसीमध्ये प्रवेशासाठी जून 2027 मध्ये नियोजित प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल.
केंद्र सरकारने पुढे सांगितले की, मुलींच्या कॅडेट्ससाठी योग्य वैद्यकीय चाचण्या आणि प्रशिक्षण अभ्यासक्रमांव्यतिरिक्त, इतर अनेक सुधारणा आणि पुनर्रचना प्रणालीमध्ये गोपनीयता, सुरक्षा प्रदान करण्यासाठी कराव्या लागतील. तसेच अधिकारी मंडळ सर्व संबंधित बाबींची तपासणी करत आहे जेणेकरून मुलींसाठी अनुकूल पायाभूत सुविधा बदलता येतील.
न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांचे खंडपीठ हे केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्राची तपासणी करेल. 22 सप्टेंबर रोजी वकील कैलास मोरे यांच्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने सरकारला RIMC आणि RMS मध्ये मुलींच्या समावेशाच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडण्यास सांगितले होते.